Latest News

Latest News
Loading...

शहरात होणार भव्य आदिवासी पर्व, दोन दिवसीय राज्यस्तरीय चर्चासत्र व परिसंवादाचं आयोजन

प्रशांत चंदनखेडे वणी 

आदिवासी सोशल फोरम (महाराष्ट्र) वणी शाखेच्या वतीने विर बिरसा मुंडा, विर बाबुराव शेडमाके व विर शामदादा कोलाम यांच्या जयंतीचे औचित्य साधून आदिवासी पर्व आयोजित करण्यात आलं  आहे. या तीनही क्रांतिवीरांची संयुक्त जयंती साजरी करण्यात येत असून त्यांच्या जयंती निमित्त १८ व १९ नोव्हेंबरला स्थानिक शेतकरी मंदिर येथे आयोजित आदिवासी पर्वात दोन दिवसीय राज्यस्तरीय चर्चासत्र व परिसंवादाचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी ११ वाजेपासून सायंकाळी ७ वाजेपर्यंत चर्चासत्र व परिसंवाद चालणार असून सायंकाळी ७ ते रात्री ९ वाजेपर्यंत सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहे. 

१८ नोव्हेंबरला सकाळी ११ वाजता या आदिवासी पर्वाचे थाटात उद्घाटन होणार असून उद्घाटक म्हणून भा.प्र.से. (आय.ए.एस.) आयुक्त (आदिवासी संशोधन प्रशिक्षण संस्था, म.रा. पुणे) नरेंद्र पोयाम यांची उपस्थिती लाभणार आहे. लेखक, कवी, साहित्यिक तथा जेष्ठ सामाजिक विचारवंत उत्तम गेडाम यांच्या अध्यक्षतेत होणाऱ्या या उद्घाटन सोहळ्याला मुख्य अतिथी म्हणून अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेचे म.रा. प्रदेश अध्यक्ष रामसाहेब चव्हाण उपस्थित राहणार आहेत. तर प्रमुख पाहुणे म्हणून जेष्ठ सामाजिक कार्यकर्त्या पुष्पा आत्राम, सामाजिक कार्यकर्ते लेतुजी जुनगरे, लेखक, कवि, साहित्यिक प्रा. वसंतराव कनाके, बिरसा ब्रिगेडचे (म.रा.) अध्यक्ष डॉ. अरविंद कुडमेथे, सामाजिक कार्यकर्ते पैकाजी आत्राम उपस्थित राहणार आहेत. आदिवासी पर्वाच्या पहिल्या सत्रात दुपारी २ ते साय. ७ वाजेपर्यन्त भारतिय संविधान व आदिवासी समूह या विषयावर चर्चासत्र व परिसंवाद रंगणार आहे. या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदिवासी साहित्यिक व प्रगतिशील विचारवंत तथा राष्ट्रीय आदिवासी संवैधानिक हक्क परिषदेचे अध्यक्ष गित घोष राहणार आहेत. तर या कार्यक्रमाला प्रमुख वक्ते म्हणून शिवाजी महाविद्यालय राजुराचे समाजशास्त्र विभाग प्रमुख प्रा. डॉ. विठ्ठल आत्राम व ट्रायबल फोरमचे संस्थापक अध्यक्ष (यवतमाळ) ऍड. प्रमोद घोडाम हे उपस्थित राहणार आहेत. 

रविवार १९ नोव्हेंबरला सकाळी ११ ते सायं. ७ वाजेपर्यंत चर्चासत्र व परिसंवाद होणार आहे. या कर्यक्रमाला मुख्य वक्ते म्हणून आफ्रोट संघटनेचे अध्यक्ष तथा बार्किंग ग्रुपचे (राष्ट्रीय जनजाती आयोग) सदस्य ऍड. राजेंद्र मरसकोल्हे उपस्थित राहणार असून ते स्वातंत्र्योत्तर स्वसमाज परिवर्तनासाठी आदिवासी आंदोलने या विषयावर परिसंवाद साधणार आहेत. तर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नागपूरच्या (GMC) डॉ.प्रो. संगिता भलावी या आदिवासी स्त्रियांच्या समस्या या विषयावर चर्चा करणार आहेत. या कार्यक्रमाचे अध्यक्ष लोकमान्य टिळक महाविद्यालय वणीचे प्रा. गणेश माघाडे राहतील. कार्यक्रमाचे प्रास्ताविक ऍड. अरविंद सिडाम, सूत्रसंचालन माया मरसकोल्हे तर आभार प्रदर्शन संतोष चांदेकर हे करतील. या आदिवासी पर्वाच्या स्वागताध्यक्षाची जबाबदारी आदिवासी सोशल फोरम वणीचे अध्यक्ष रमेश मडावी हे पार पाडणार आहेत.

सायंकाळच्या सत्रात रात्री ९ वाजेपर्यंत सांस्कृतिक कार्यक्रम होणार असून यात आदिवासी नृत्य सादर केले जाणार आहेत. नृत्य कलावंतांनी या सांस्कृतिक कार्यक्रमात नृत्य सादर करण्याकरिता अमोल टी-कॉर्नर (शिवाजी चौक) येथे नाव नोंदणी करण्याचे आव्हान करण्यात आले आहे. चर्चासत्र व परिसंवादातून वैचारिक पातळी वाढविणाऱ्या या आदिवासी पर्वाला जनतेने मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शविण्याचे आव्हान आदिवासी सोशल फोरमचे पदाधिकारी व सदस्यांनी केले आहे. 

No comments:

Powered by Blogger.