Latest News

Latest News
Loading...

स्नेह भाव जपणाऱ्या सर्वांनाच दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा

प्रशांत चंदनखेडे वणी 

स्नेह, प्रेम व आपुलकीच्या नात्यात गुंफणारा सण म्हणजे दिवाळी. मित्रमंडळी व नातेवाईकांबरोबर आनंद साजरा करण्याची पर्वणी देणारा हा सण नात्यात गोडवा निर्माण करून नातेसंबंध आणखीच घट्ट करतो. कुटुंबीय, मित्र मंडळी व नातेवाईकांसोबत काही आनंदाचे क्षण घालविण्याचा योग्य जुळवून आणणाऱ्या दिवाळी या सणाची सर्वानाच उत्सुकता लागलेली असते. दिवाळीच्या निमित्ताने का होईना सर्व कुटुंबीय एकत्र येऊन आनंद साजरा करतात. नातेवाईकांचं आगमन होतं. घरात चहल पहल दिसून येते. घरात आनंद संचारलेला दिसतो. घरातील आनंदमय वातावरण मन प्रफुल्लित करतं. घर अंगणात दिव्यांची आरास लागलेली असते. आकर्षक सजावटींनी घर सजलेलं असतं. असं हे आल्हाददायक वातावरण दिवाळीच्या निमित्ताने सर्वत्र पहायला मिळतं. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांच्याच चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहतांना दिसतो. दिवाळी आनंदात साजरी करण्याचा उत्साह शिगेला पोहचला असतो. हे आनंदमय वातावरण निरंतर तुमच्या जीवनात रहावं, हीच या दिवाळीच्या निमित्ताने आमच्याकडून शुभेच्छा !

मनं जुळली आणि नातंही घट्ट झालं, दिवाळीच्या निमित्ताने का होईना वातावरण आनंदात न्हालं ! दिवाळीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा !

शुभेच्छुक :-  डॉ. प्रिया चं. झाडे (B.A.M.S.), डॉ. झाडे होमिओ हॉस्पिटल वणी, मारेगाव 

No comments:

Powered by Blogger.