प्रशांत चंदनखेडे वणी
वेकोलिने दत्तक घेतलेल्या गावांतील शाळाकरी विद्यार्थ्यांकरिता सुरु केलेल्या बसेस वेकोलि प्रशासनाने अचानक बंद करून विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रवासात अडथळे निर्माण करण्याचा प्रयत्न केला. ही गंभीर बाब महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते राजू उंबरकर यांच्या कानावर पडताच त्यांनी मनसेचे तालुकाध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांच्याकडे वेकोलिच्या अन्यायकारक धोरणाचा समाचार घेण्याची जबाबदारी सोपविली. फाल्गुन गोहोकार यांनी गावकऱ्यांच्या पाठीशी उभे राहून वेकोलि अधिकाऱ्यांची चांगलीच कान उघाडणी केली. मनसेने विद्यार्थ्यांसाठी असलेल्या बसेस पूर्ववत सुरु करण्याकरिता घेतलेल्या आक्रमक भूमिकेने वेकोलिचे अधिकारी नरमले. मनसेचा आक्रमक पवित्रा पाहून वेकोलि अधिकाऱ्यांनी शेवटी बसेस सुरु करण्याचा निर्णय घेतला. आणि बंद झालेल्या बसेस नियमित सुरु झाल्या. मनसेच्या पाठिंब्याने गावकऱ्यांच्या मागणीला यश आले, व विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रवासातील अडथळे दूर झाले. वेकोलिने बसेस बंद केल्याने विद्यार्थ्यांना शाळेत जाणे येणे करतांना मोठा त्रास सहन करावा लागत होता. पण मनसेने विद्यार्थ्यांची शाळेत जातांना होणारी गैरसोय दूर केल्याने विद्यार्थ्यांमधून समाधान व्यक्त होतांना दिसत आहे.
वणी नॉर्थ क्षेत्रातील कोलार पिंपरी कोळसाखानी अंतर्गत वेकोलिने कोलार पिंपरी, बोरगाव, ब्राह्मणी व निळापूर ही गावे दत्तक घेतली. या गावांना आवश्यक सोइ सुविधा पुरवण्याची जबादारी वेकोलिची असतांना वेकोलि प्रशासन आपली जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न करीत आहे. खान बाधित क्षेत्रात वास्तव्य करणाऱ्या गावकऱ्यांना अनेक समस्यांना तोंड लागते. प्रदूषणाने आरोग्य तर कोळसाखाणीतील ब्लास्टिंगमुळे निवासाच्या समस्या निर्माण झाल्या आहेत. कोळशाच्या धुळीमुळे शेत पिकांचेही मोठे नुकसान होत आहे. कोळसाखाणींकडे जाणारे रस्ते कोळशाच्या वाहतुकीने नेहमी गजबजलेले असतात. शेकडो कोळसा वाहतुकीची वाहने दिवस रात्र या रस्त्यांनी धावत असतात. वणी-उकनी या मार्गावर अनेक कोळसाखानी असून कोळसा वाहतुकीमुळे या मार्गाची नेहमी दुरावस्था झालेली पहायला मिळते. या मार्गाने जीव मुठीत धरून मार्गक्रमण करावे लागते. वणी वरून दुचाकीने उकनी मार्गाने प्रवास करणाऱ्या नागरिकांचा गाव गाठत पर्यंत जीव भांड्यात पडलेला असतो. त्यामुळे कोळसा वाहतुकीच्या या रस्त्यावरून शाळेत जाणे येणे करतांना विद्यार्थ्यांना धोकादायक प्रवास करावा लागू नये म्हणून वेकोलिने विद्यार्थ्यांकरिता बस सेवा सुरु केली. परंतु अचानक ही बस सेवा बंद करण्यात आल्याने विद्यार्थी व पालकांपुढे मोठा पेच निर्माण झाला. वेकोलिने विद्यार्थ्यांना शाळेत जाणे येणे करण्याकरिता असलेल्या बसेस बंद केल्याने गावकऱ्यांनी मनसेचे नेते राजू उंबरकर यांच्याकडे धाव घेतली. राजू उंबरकर यांना बस सेवा सुरु करण्यास सहकार्य करण्याची मागणी केली. तसेच बस सेवा सुरु करण्याच्या मागणीला घेऊन रस्ता रोको आंदोलनही केले.
मनसे नेते राजू उंबरकर यांनी गावकऱ्यांची समस्या सोडविण्याची जबादारी फाल्गुन गोहोकार यांच्यावर टाकली. फाल्गुन गोहोकार यांनी गावकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देत वेकोलि अधिकाऱ्यांची चांगलीच कान उघाडणी केली. मनसेच्या पाठिंब्याने अधिकारी नरमले. त्यांनी शाळकरी विद्यार्थ्यांकरिता असलेल्या बसेस सुरु करण्याचे आश्वासन दिले. आणि बस सेवा पूर्ववत सुरु केली. वेकोलिने बसेस बंद केल्याने विद्यार्थ्यांना शाळेत जाणे येणे करतांना मोठ्या अडचणी येऊ लागल्या होत्या. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून मनसेने बस सेवा सुरु करण्याकरिता आक्रमक भूमिका घेतली. फाल्गुन गोहोकार यांनी बस सुरु करण्याची मागणी रेटून धरत वेकोलि अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले. शेवटी मनसेच्या मागणीची दखल घेत वेकोलि प्रशासनाने बंद केलेल्या दोनही बस पूर्ववत सुरु केल्या. त्यामुळे विद्यार्थ्यांची शाळेत जाणे येणे करतांना होणारी फरफट थांबली. मनसेच्या पाठिंब्याने बस सेवा सुरु झाल्याने विद्यार्थ्यांमधून समाधान व्यक्त होतांना दिसत आहे. मनसेचे तालुकाध्यक्ष फाल्गुन गोहोकार, राजू काळे, मंगेश शेंडे, गोवर्धन पिदूरकर, शिरीष भवरे, प्रविण कळसकर, अनंता डाखरे, योगेश काळे, जयश्री उपरे, विद्या शेंडे, अमृता बांगडे, शोभा चामाटे, पौर्णिमा खामनकर, सविता मत्ते, अर्चना डाखरे यांनी या आंदोलनात सहभाग घेतला होता.
No comments: