Latest News

Latest News
Loading...

नेत्र चिकित्सा व मोती बिंदू शस्त्रक्रिया शिबिराला मिळाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद, ७० रुग्ण मोती बिंदू शस्त्रक्रियेसाठी रवाना

प्रशांत चंदनखेडे वणी 

दातृत्व भावना जपणारे शहरातील प्रतिष्ठित व्यापारी विजय चोरडिया यांनी सामाजिक जाणिवेतून अनेक सेवाभावी उपक्रम राबविले आहेत. सामाजिक उत्तरदायित्वातून त्यांनी समाजसेवेचा घेतलेला वसा सत्कार्याचे पांग फेडणारा ठरला आहे. स्वतःसाठी जगाला तो काय जगाला, ही थोर समाजसेवकांची शिकवण विजय चोरडिया यांनी सार्थकी ठरविली आहे. इतरांच्या वेदनांवर मायेची फुंकर घालणारं हे समाजसेवी व्यक्तिमत्व गोरगरिबांच्या गळ्यातलं टाईत बनलं आहे. गरजू गरिबांच्या मदतीसाठी नेहमी तत्पर असणाऱ्या विजय चोरडिया यांचं मदतकार्य निस्वार्थी भावनेचं राहिलं आहे. अडचणीत सापडलेल्या आणि नैराश्येने वेढलेल्या लोकांच्या जीवनातील नैराश्य त्यांनी दूर केलं आहे. अडचण कोणतीही असो ढोबळ मानाने त्यांनी मदत केली आहे. नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्याचं तर त्यांनी व्रण घेतलं आहे. वेळोवेळी आरोग्य तपासणी व रोग निदान शिबिरांचं आयोजन करून गोर गरिबांवर त्यांनी मोफत उपचार केले आहेत. नुकतंच विजय चोरडिया यांच्या पुढाकारातून भालर व मुकुटबन येथे मोफत नेत्र चिकित्सा व मोती बिंदू शस्त्रक्रिया शिबीर घेण्यात आलं. या दोनही शिबिरांना नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. स्व. पारसमल चोरडिया फाउंडेशन वणी व कस्तुरबा हॉस्पिटल सेवाग्राम यांच्या विद्यमाने या शिबिरांचं आयोजन करण्यात आलं होतं. या दोनही शिबिरांमध्ये नेत्र तपासणी केलेल्या ३२ व ३८ रुग्णांवर मोफत शस्त्रक्रिया करण्यात येणार असून त्यांना कस्तुरबा रुग्णालय येथे पाठविण्यात आलं आहे. शस्त्रक्रियेचा व औषोधोपचाराचा संपूर्ण खर्च सामाजिक दायित्वातून विजय चोरडिया हे उचलणार आहेत. 

भाजपचे प्रदेश कार्यकारणी सदस्य तथा प्रतिष्ठित व्यापारी विजय चोरडिया यांच्या पुढाकारातून १८ व १९ नोव्हेंबरला भालर व मुकुटबन येथे मोफत नेत्र चिकित्सा व मोती बिंदू शस्त्रक्रिया शिबरांचं आयोजन करण्यात आलं. भालर येथे जिल्हा परिषद शाळेत घेण्यात आलेल्या या शिबिरात ३६० रुग्णांनी नेत्र तपासणी केली. तर मुकुटबन येथे राजेश्वर शिव मंदिर येथे घेण्यात आलेल्या शिबिरात ३८७ रुग्णांनी नेत्र तपासणी केली. नेत्र रुग्णांना ५ डिसेंबरला मोफत चष्मे वाटप करण्यात येणार आहेत. तर मोती बिंदू असलेल्या रुग्णांना कस्तुरबा रुग्णालय सेवाग्राम (वर्धा) येथे शस्त्रक्रियेसाठी पाठविण्यात आले आहे. विजय चोरडिया यांनी स्वतः रुग्णांना आधार देऊन बसमध्ये बसविले, व सेवाग्रामला रवाना केले. सामाजिक जाणिवेतून विजय चोरडिया यांनी स्व. पारसमल चोरडिया फाउंडेशनच्या वतीने घेतलेल्या या शिबिराच्या यशस्वीतेकरिता कार्यकर्त्यांनी मोठे परिश्रम घेतले. 

No comments:

Powered by Blogger.