नात्यात आनंद भरणाऱ्या दिवाळी या सणाच्या सर्व जनतेला हार्दिक शुभेच्छा, मतभेद दूर सारून चला आनंदचं पर्व साजरं कारुया
प्रशांत चंदनखेडे वणी
दीपावली हा सण संपूर्ण देशात आनंदोत्सहात साजरा केला जात असून देशवासी या सणाला आनंदी जीवनाच्या शुभेच्छा देतात. इष्टमित्र व परिचितांसोबत प्रत्येकचं जण दिवाळी साजरी करतांना दिसतो. सण, उत्सव हे एकमेकांसोबत साजरे करण्याची भारतीय परंपरा राहिली आहे. आणि ती आजही बंधुभावाच्या नात्याने जोपासली जात आहे. दिवाळी तुझी न माझी नाही तर हा आपला भारतीय सण आहे, तो सर्वानी एकत्र येत आनंदात साजरा करण्याची आपली संस्कृती राहिली आहे. सर्वसामान्यांच्या जीवनात आनंद फुलविण्याचं कार्य सामाजिक भान जपलेल्या प्रत्येकांनीच केलं आहे. सामाजिक उत्तरदायित्व व दातृत्व भावनेतून आर्थिक दुर्बल घटकांना मदतीचा हात देऊन त्यांच्या जीवनाला आधार देण्याचं काम मानवी दृष्टिकोन जोपासणाऱ्यांनी सदैव केलं आहे. कुणी गाजावाजा केला तर कुणी साधी चर्चाही होऊ दिली नाही. मदतीचं भांडवल न करता मदतगारांनी केवळ मदतीची भावना ठेवली. आणि आजही त्यांच्या दरवाजातून कुणी खाली हात जात नाही. जरिया वेगळा असेल मिळकतीचा पण भाव आजही आहे मदतीचा, पद्धत वेगळी असेल कार्याची, पण उद्देश एकच आहे बंधुभावाचा. सण तुझा असो की माझा बंध आपले जुळले आहे, माझ्या आनंदात तू आणि तुझ्या आनंदात मी सहभागी व्हावं ही संस्कृती आपली आहे. आकलन करतांना मानवी संकल्पनेचं भाव निर्मळ असावा, भावना तिरस्कारित नसावी मनात बंधुभाव असावा. तीक्ष्ण विचारांना तिलांजली देऊन बंधुत्वाचं नातं दृढ करूया, या आपण सारे मिळून दिवाळी साजरी करूया. संबंधात गोडवा आणून एकमेकांना मिठाई भरवूया. आणि आनंदाचा सण आनंदाने साजरा करूया. माझ्या सर्व मित्र मंडळींना व वणी उपविभागातील सर्व जनतेला दिवाळीच्या भरभरून शुभेच्छा.
बंधुभावाची संस्कृती आपली आपण बंधुभाव जपला पाहिजे, तुझ्या आनंदात मी तर माझ्या आनंदात तू असला पाहिजे ! आनंदाची उधळण करणाऱ्या या दिवाळीच्या सर्व जनतेला हार्दिक शुभेच्छा !
शुभेच्छुक :- इजहारभाई शेख उपाध्यक्ष यवतमाळ जिल्हा काँग्रेस कमेटी
No comments: