Latest News

Latest News
Loading...

दिवाळी या आनंददायी सणाच्या वणी विधानसभा क्षेत्रातील सर्व जनतेला हार्दिक शुभेच्छा


प्रशांत चंदनखेडे वणी 

दिव्यांच्या लख्ख प्रकाशाने जसा काळोख दूर व्हावा तसा नागरिकांच्या समस्या दूर करण्याचा विडा मनसेने उचलला आहे. दिवाळीत आनंदाची उधळण व्हावी तसे नागरिकांचे प्रश्न मनसेने उचलून धरले आहेत. वणी विधानसभा मतदार संघात सदैव आनंदी वातावरण रहावं हा संकल्प मनसेने केला आहे. वणी विधानसभा मतदार संघ सुजलाम सुफलाम करण्याच्या दिशेने मनसेची वाटचाल सुरु आहे. वणी मतदार संघातील जनतेची वर्षानुवर्षीची पीडा दूर करण्याचा निर्धारच मनसेने केला आहे. बेरोजगारी मुक्त वणी विधानसभा क्षेत्र हा मनसेचा अजेंडा युवकांच्या स्वप्नांना चालना देणारा ठरला आहे. कास्तकारांचे प्रश्न उचलून मनसेने त्यांच्या आशा पल्लवित केल्या आहेत. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रवासातील अडथळे मनसेने दूर केले आहेत. कोळसाखाणींमुळे निर्माण झालेल्या समस्यांवर मनसेने आवाज उठविला आहे. खान बाधित क्षेत्रातील समस्या सोडविण्याकरिता मनसेने पुढाकार घेतला आहे. जनतेच्या प्रश्नांना व समस्यांना घेऊन मनसेने नेहमी आक्रमक भूमिका घेतली आहे. अन्यायकारक धोरणांविरुद्ध आवाज बुलंद करून मनसेने शासन प्रशासनाला घाम फोडण्याचं काम केलं आहे. जनतेवरील अन्याय खपवून घेतला जाणार नाही, ही बेधडक भूमिका मनसेची राहिली आहे. सर्वसमावेशक कार्य ही मनसेची कार्य पद्धती राहिली आहे. मनसेचे नेते राजूभाऊ उंबरकर यांनी वणी विधानसभा क्षेत्राचा कायापालट करण्याची भीष्म प्रतिज्ञा केली आहे. त्यांच्या पावलांवर पाऊल ठेऊन पदाधिकारी व कार्यकर्तेही कामाला लागले आहेत. मनसेचे तालुकाध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांनी नागरिकांच्या समस्यांना प्राधान्य देऊन अनेक आंदोलनं केली आहेत. जनतेला न्याय मिळवून देण्याचं काम फाल्गुन गोहोकार यांनी केलं आहे. फाल्गुन गोहोकार हे एक निर्भीड व्यक्तिमत्व म्हणून पुढे आलं आहे. समस्या कोणतीही असो जनतेच्या पाठीशी उभं राहण्याचं धाडस फाल्गुन गोहोकार यांनी नेहमी दाखविलं आहे. मनसेच्या ताफ्यात दाखल झालेलं फाल्गुन गोहोकार हे तालुक्यातील एक कुशल नेतृत्व ठरू लागलं आहे. फाल्गुन गोहोकार यांनी शेतपिकांचं झालेलं नुकसान भरून देण्याकरिता नुकतंच आंदोलन उभारलं आहे. कास्तकारांना नुकसान भरपाई देण्याकरिता वेकोलिच्या अधिकाऱ्यांना अल्टिमेटम दिला आहे. मनसेने वणी विधासभा क्षेत्रात आनंदाचं वातावरण निर्माण केलं आहे. जनतेच्या आनंदातच आपला आनंद आहे, ही मनसेची नेहमी भूमिका राहिली आहे. दिवाळीचा आनंदही मनसे जनतेसोबत साजरा करतांना दिसत आहे. फाल्गुन गोहोकर यांनी वणी विधासभा क्षेत्रातील सर्व जनतेला दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत. 

आनंद दरवळू द्या जीवनात, दिवाळीचा सण आहे, आनंदाची उधळन करण्याचा हा क्षण आहे ! दिवाळीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा !

शुभेच्छुक :- फाल्गुन गोहोकार तालुकाध्यक्ष महाराष्ट्र नवनिर्माण सेना वणी 

No comments:

Powered by Blogger.