प्रशांत चंदनखेडे वणी
शहरातील इंदिरा चौक येथे राहणाऱ्या व्यक्तीवर जातीवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशाल बाबाराव खांदनकर (४४) असे या आरोपीचे नाव आहे. ही कार्यवाही २४ मार्चला करण्यात आली.
इंदिरा चौक येथीलच संग्राम बाजीराव गेडाम (२६) हा आपल्या घरासमोर खुर्चीवर बसला असतांना आरोपी विशाल खांदनकर याने त्याची औकात काढली. त्याने विनाकारण वाद उपस्थित करून संग्राम गेडाम याला जाती वरून शिवीगाळ केली. विशाल खांदनकर याने जातीवाचक शिवीगाळ केल्याने संग्राम गेडाम याला अपमानित झाल्यासारखे वाटले. त्यामुळे त्याने पोलिस स्टेशनला येऊन विशाल खांदनकर याच्या विरुद्ध तक्रार नोंदविली. संग्राम गेडाम याच्या तक्रारी वरून पोलिसांनी विशाल खांदनकर याच्यावर ऍट्रॉसिटी ऍक्ट अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलिस करीत आहे.
No comments: