प्रशांत चंदनखेडे वणी
विधी क्षेत्रात आपली एक वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या व वकील म्हणून वणी तालुक्यात सर्वपरिचित असलेल्या ऍड. विजया विश्वास शेळकी मांडवकर यांचं मंगळवार दि. २५ मार्चला सायंकाळी व्ह्रदय विकाराच्या तीव्र झटक्याने दुःखद निधन झालं. मृत्यू समयी त्यांचं वय अवघं ५० वर्षांचं होतं. त्याचं असं हे अकाली निधन झाल्याने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्यांच्या निधनाने आप्तस्वकीय व परिसरात शोककळा पसरली आहे. ऍड. विजया शेळकी मांडवकर या अतिशय सुस्वभावी व मनमिळाऊ स्वभाच्या होत्या. मितभाषी स्वभावामुळे वकिली क्षेत्रात त्यांचं एक वेगळं स्थान होतं. बोधे नगर चिखलगाव येथे राहणाऱ्या ऍड. विजया या राजूर ग्रामपंचायतीच्या सदस्य देखील राहिल्या आहेत. त्यांच्या पश्च्यात पती विश्वास शेळकी व मुलगी विजेता शेळकी असा आप्त परिवार आहे. २६ मार्चला दुपारी त्यांच्या पार्थिवावर मोक्षधाम येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. ऍड. विजया शेळकी मांडवकर यांना लोकसंदेश न्यूज परिवाराकडून भावपूर्ण श्रद्धांजली.
No comments: