Latest News

Latest News
Loading...

Breaking news, वागदरा येथील युवकाचा जीएस कंपनीत आढळला मृतदेह, खून झाल्याचा पूर्णपणे संशय, दोन संशयित आरोपी ताब्यात


प्रशांत चंदनखेडे वणी :-

वणी भालर मार्गावरील खंडर अवस्थेतील जीएस ऑईल मिल कंपनीत शहरालगत असलेल्या वागदरा येथील युवकाचा मृतदेह आढळून आला असून त्याचा खून करून मृतदेह बंद कंपनीच्या पाण्याच्या खोल टाक्यात फेकण्यात आल्याचा पूर्णपणे संशय व्यक्त करण्यात येत आहे. ही धक्कादायक घटना बुधवार दिनांक 15 ऑक्टोबरला दुपारी 12 ते 12.30 वाजताच्या सुमारास उघडकीस आली. मनोज वानखेडे वय अंदाजे 35 वर्षे रा. वगदरा ता. वणी असे या खून झाल्याचा संशय असलेल्या युवकाचे नाव आहे. या प्रकरणात  दोन संशयित आरोपींनाही पोलिसांनी ताब्यात घेतल्याचे सांगण्यात येत आहे. विशेष म्हणजे मृतकाच्या पत्नीने काही दिवसांपूर्वी या आरोपींपैकीच एकाची अश्लील व्हिडिओ तयार करून ब्लॅकमेल करण्यात येत असल्याची तक्रार पोलिस स्टेशनला नोंदविली होती.

वणी तालुक्यातील वागदरा (नवीन) येथे कुटुंबासह वास्तव्यास असलेला मनोज हा रंगकाम करून आपला व आपल्या परिवाराचा उदरनिर्वाह करायचा. आज त्याचा खंडर अवस्थेतील जीएस ऑईल मिल कंपनीत मृतदेह आढळून आला. त्याचा खून करण्यात आल्याचा पूर्ण संशय असून पोलिसांनी दोन संशयित आरोपींना तत्काळ ताब्यात घेतले आहे. तर काही आरोपी फरार असल्याचे सांगण्यात येत आहे. 

मृतक मनोज वानखेडे याच्या पत्नीने काही दिवसांपूर्वी या आरोपींपैकी एकाची अश्लील व्हिडिओ तयार करून ब्लॅकमेक करीत असल्याची तक्रार केली होती. त्यामुळे अनैतिक संबंधातून युवकाचा खून करण्यात आल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. पोलिस घटस्थळी दाखल झाले असून खोल पाण्याच्या टाक्यातून मृतदेह बाहेर काढण्याची प्रक्रिया सुरू आहे.

No comments:

Powered by Blogger.