प्रशांत चंदनखेडे वणी :-
नगरपरिषद निवडणुकीचे वारे आता वेगाने वाहू लागले असून, शहरातील राजकीय वातावरण तापू लागले आहे. विविध प्रभागांत संभाव्य उमेदवारांची चर्चा रंगत असताना, प्रभाग क्रमांक ७ (अ) मधून संभाव्य उमेदवार म्हणून राशी प्रवीण शर्मा यांच्या नावाची चर्चा रंगू लागली आहे.
राशी शर्मा या सामाजिक कार्यात पुढाकार घेणाऱ्या, शांत पण प्रभावी व्यक्तिमत्त्वाच्या असून त्यांनी गेल्या काही वर्षांत नागरिकांशी घट्ट नाळ जुळवली आहे. परिसरात त्यांची कार्यतत्पर व कर्तव्यनिष्ठ महिला म्हणून ओळख असून सामाजिक कार्यातही त्या हिरीरीने सहभाग घेतात. स्त्री सक्षम कशी असावी याचं त्या जिवंत उदाहरण आहेत. तसेच त्यांची प्रखर व रोकठोक भूमिका यामुळे परिसरात त्यांची एक जबाबदार कार्यकर्ती म्हणून ओळख निर्माण झाली आहे.
त्यांच्या कार्यतत्परतेला व सौम्य स्वभावाला नागरिकांकडून उत्तम प्रतिसाद मिळत असून, प्रभागातील अनेक नागरिक त्यांना आगामी निवडणुकीत उमेदवारी देण्यात यावी अशी अपेक्षा व्यक्त करत आहेत. स्थानिक पातळीवरील या वाढत्या चर्चेमुळे प्रभाग ७ (अ) मधील निवडणूक चुरशीची होण्याची चिन्हे स्पष्ट दिसत आहेत.
राजकीय निरीक्षकांच्या मते, जर राशी प्रवीण शर्मा यांनी उमेदवारीचा निर्णय घेतला, तर त्या प्रभागातील निवडणुकीत एक बळकट, लोकप्रिय आणि प्रभावशाली चेहरा म्हणून त्या उदयास येऊ शकतात.
No comments: