Latest News

Latest News
Loading...

आरक्षण जाहीर होताच इच्छुकांची नावे आली चर्चेत, झेडपी उमेदवारीसाठी सरपंच प्रविण झाडे यांच्या नावाचीही चर्चा


प्रशांत चंदनखेडे वणी :-

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे आरक्षण जाहीर झाल्यानंतर राजकीय हालचालींना प्रचंड वेग आला असून गावगाड्यात उमेदवारीसाठी इच्छुक असणाऱ्या नावांचीही चर्चा सुरु झाली आहे. राजकीय व सामाजिक क्षेत्रात कार्यरत व सक्रिय असलेले अनेक जण निवडणूक लढविण्याच्या तयारीत असून उमेदवारी मिळण्यासाठी त्यांची धावपळ सुरु झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. राजकीय पक्षांकडे उमेदवारी मिळण्यासाठी इच्छुकांची वारी सुरु झाली आहे. तर काही जण स्वबळावरही लढण्यासाठी कंबर कसून असल्याचे दिसून येत आहे. सध्या राजकीय पक्ष वेट अँड वॉचच्या भूमिकेत असून नेत्यांचे निकटवर्तीय पक्षाकडून संधी मिळते काय, याकडे लक्ष लावून बसले आहेत. अशातच पेटूर ग्रामपंचायतीचे विद्यमान सरपंच प्रविण झाडे हे घोन्सा-वागदरा गटातून जिल्हा परिषद निवडणूक लढविण्याच्या तयारीत असल्याची जोरदार चर्चा गाववासीयांमध्ये रंगली आहे. घोन्सा-वागदरा सर्कलमधून जिल्हा परिषद निवडणूक लढविण्यासाठी त्यांनी पूर्णपणे कंबर कसल्याचेही गावकऱ्यांच्या चर्चेतून ऐकायला मिळत आहे. 

जिल्हा परिषद गटाच्या निघालेल्या आरक्षणात घोन्सा-वागदरा गट हा नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी (जनरल) राखीव आहे. या गटातून प्रविण झाडे हे निवडणूक लढविणार असल्याच्या चर्चेचे वातावरण दिसून येत आहे. प्रविण झाडे हे पेटूर ग्रामपंचायतीचे विद्यमान सरपंच असून महाराष्ट्र प्रदेश सरपंच संघटनेचे ते तालुकाध्यक्ष आहेत. त्यांनी गावगाड्यात अनेक उपक्रमही राबविले आहेत. युवा तडफदार नेतृत्व म्हणूनही त्यांच्याकडे पाहिलं जातं. गावातील समस्या व गावकऱ्यांचे प्रश्न सोडविण्याकरिता ते नेहमी तत्पर असतात. गावात अधिकाधिक सोइ सुविधा उपलब्ध करून देण्यासाठीही त्यांची सतत धडपड सुरु असते. 

गवावासियांच्या सुखदुःखतही ते धावून जातात. तळमळीने कार्य करण्याची त्यांची जिद्द गावकऱ्यांच्या विश्वासास पात्र ठरली आहे. नुकतेच त्यांनी वणी कायर रस्त्याच्या दुरुस्तीच्या मागणीला घेऊन तीव्र आंदोलन छेडले होते. विकासासाठीची धडपड आणि गावकऱ्यांसाठीची तळमळ प्रविण झाडे यांची खास ओळख बनली आहे. आणि धडपडीचा माणूस म्हणून गावकरी त्यांच्यावर विश्वास दाखवू लागले आहेत. हीच त्यांची जनतेप्रती असलेली कळकळ निवडणुकीत त्यांना मतदारांचा विश्वास संपादित करण्यास जमेची बाजू ठरणार आहे. त्यामुळे प्रविण झाडे हे पक्षाकडून निवडणूक वाढवितात की स्वबळावर, याकडे गाववासीयांचे लक्ष लागले आहे. 

No comments:

Powered by Blogger.