प्रशांत चंदनखेडे वणी
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांचा काळ लक्षात घेता पक्ष संघटन मजबूत करण्यावर राजकीय पक्षांचा भर दिसून येत आहे. पक्ष वाढविण्याकरिता पक्ष प्रवेशावरही भर दिला जात आहे. सामाजिक व राजकीय क्षेत्रात उत्तम कामगिरी करणाऱ्या व्यक्तींना पक्षात मोठी व महत्वाची पदं दिली जात आहे. भारतीय जनता पार्टीनेही उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींची महत्वाच्या पदांवर नियुक्ती करून आगामी निवडणुकांच्या दृष्टीने कंबर कसली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजपचा डंका वाजविण्याकरिता नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते सज्ज झाल्याचे त्यांच्या एकूणच हालचालींवरून दिसून येत आहे. भारतीय जनता पक्षात मुख्य पदांवर नियुक्ती देतांना शहरातील प्रख्यात विधिज्ञ व बुद्धिचातुर्य व्यक्तिमत्व असलेल्या ऍड. निलेश चौधरी यांची वणी शहर अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या नियुक्तीने राजकीय व सामाजिक क्षेत्रातून समाधान व्यक्त करण्यात येत आहे. भाजपच्या शहर अध्यक्ष पदावर ऍड. निलेश चौधरी यांची निवड झल्याने शहरातील कार्यकर्त्यांमध्ये एक वेगळाच उत्साह पाहायला मिळत आहे.
ऍड. निलेश चौधरी यांनी विधी क्षेत्रात आपली एक वेगळीच ओळख निर्माण केली आहे. वणी उपविभागातील अग्रगण्य वकिलांमध्ये त्यांचं नाव समोर येतं. त्यांनी राजकीय व सामाजिक कार्यातही आपली छाप सोडली आहे. अनुभवी वकील असलेले निलेश चौधरी हे राजकीय डावपेच आखण्यातही तेवढेच तरबेज आहेत. वकील संघाच्या निवडणुकीत त्यांनी हे सिद्धही केलं आहे. अभ्यासू व तर्कशुद्ध विचारातून समाजात योग्य भूमिका मांडणाऱ्या ऍड. निलेश चौधरी यांच्या शहर अध्यक्ष पदावरील नियुक्तीने शहरातील राजकारणाला कलाटणी व एक वेगळी दिशा मिळणार आहे. त्यांच्या नियुक्तीने शहरातील भाजपच्या राजकारणात एक नवचैतन्य जागलं आहे. रॉयल फाउंडेशन वणीचे ते संस्थापक अध्यक्ष असून सामाजिक कार्यातही ते अग्रेसर आहेत. एक बुद्धिमान वकील म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. त्यांच्या सर्वांगीण कार्याची दखल घेत भाजपचे नवनिर्वाचित जिल्हाध्यक्ष ऍड. प्रफुल चव्हाण यांनी त्यांच्यावर भाजपच्या शहर अध्यक्ष पदाची धुरा सोपविली. एका सद्द्विचारी व सुस्वभावी व्यक्तीची भाजपच्या शहर अध्यक्ष पदावर निवड झाल्याने त्यांच्यावर सर्वच क्षेत्रातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
No comments: