Latest News

Latest News
Loading...

महाविकास आघाडीचे संजय देरकर यांच्या प्रचारार्थ आज शहरातून भव्य रॅली


प्रशांत चंदनखेडे वणी 

वणी मतदार संघातील महाविकास आघाडीचे शिवसेना (उबाठा) गटाचे उमेदवार संजय देरकर यांना राजकीय व सामाजिक क्षेत्रातून मिळणारे समर्थन व पाठिंब्यामुळे त्यांची बाजू भक्कम मानली जात आहे.  त्यांच्या प्रचारालाही नागरिकांचा उदंड प्रतिसाद मिळत आहे. ते प्रचारात वरचढ ठरल्याचेही पाहायला मिळत आहे. गावागावात प्रचार सभा व कॉर्नर सभा घेऊन त्यांनी प्रचारात मुसंडी मारली आहे. महाविकास आघाडी कडूनही त्यांचा झंझावाती प्रचार सुरु आहे. संजय देरकर यांच्या अर्धांगिनी किरण देरकर या देखील पूर्ण ताकदीने प्रचार करतांना दिसत आहे. त्यांचं महिलांचं संघटन मजबूत असून त्यांच्या सोबत महिलाशक्तीही प्रचारात उतरली आहे. संजय देरकर यांच्या विजयाचा गुलाल उधळण्याकरिता त्यांचे समर्थक, कार्यकर्ते व संपूर्ण महाविकास आघाडी सज्ज झाली आहे. संजय देरकर यांच्या प्रचारार्थ आज १७ नोव्हेंबरला शहरातून भव्य रॅली काढून शक्ती प्रदर्शन करण्यात येणार आहे. या रॅलीत काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी यासह सर्व घटक पक्षांचे नेते व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत. रॅलीत त्यांच्या समर्थकांची व नागरिकांचीही मोठ्या संख्येने उपस्थिती लाभणार आहे. 

महाविकास आघाडीचे उमेदवार संजय देरकर यांचा जोरदार प्रचार सुरु आहे. त्यांच्या विजयासाठी महाविकास आघाडीचे सर्व नेते एकवटले आहेत. आज १७ नोव्हेंबरला सकाळी ११.३० वाजता त्याच्या प्रचारार्थ शहरातून भव्य रॅली काढण्यात येणार आहे. शहरातील जत्रा मैदान येथून या रॅलीला सुरुवात होणार आहे. रंगनाथ स्वामी मंदिर, शर्मा चौपाटी, गाडगेबाबा चौक, महात्मा गांधी चौक, खाती चौक या मार्गाने ही रॅली निघून टिळक चौक येथे या रॅलीची सांगता होणार आहे. या रॅलीला खासदार संजय देशमुख यांची प्रामुख्याने उपस्थिती लाभणार आहे. तेंव्हा या रॅलीत परिवर्तनवादी विचारांच्या सर्व नागरिकांनी व समर्थाकांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन महाविकास आघाडी कडून करण्यात आले आहे. 

No comments:

Powered by Blogger.