Latest News

Latest News
Loading...

अजिंक्य शेंडे यांची युवासेना उपजिल्हाप्रमुखपदी नियुक्ती


प्रशांत चंदनखेडे वणी :-

शिवसेनेच्या वतीने अजिंक्य शेंडे यांची युवासेना उपजिल्हाप्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली आहे. यवतमाळ जिल्ह्याचे पालकमंत्री तथा मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांच्या नेतृत्वाखाली वणी विधानसभा मतदारसंघात युवासेनेचे संघटन अधिक मजबूत करण्याची जबाबदारी त्यांच्यावर सोपविण्यात आली आहे.

शिवसेना मुख्यनेते तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे आणि युवासेना कार्याध्यक्ष प्रवेश सरनाईक यांच्या आदेशानुसार ही नियुक्ती करण्यात आली. विधानपरिषद आमदार कृपाल तुमाने, युवासेना राज्य सचिव शुभम नवले आणि युवासेना महाराष्ट्र कार्यकारी सदस्य हर्षल शिंदे यांच्या हस्ते अजिंक्य शेंडे यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले. यावेळी युवासेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे विचार आणि धर्मवीर आनंद दिघे यांच्या शिकवणीचा प्रसार करत पक्षवाढीसाठी सर्वांना सोबत घेऊन कार्य करण्याची अपेक्षा नियुक्तीपत्रातून व्यक्त करण्यात आली आहे.

नियुक्तीनंतर अजिंक्य शेंडे यांनी पक्षाने सोपविलेली जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडण्याचा निर्धार व्यक्त केला. वणी विधानसभा क्षेत्रातील युवकांचे प्रश्न, त्यांच्या समस्या आणि जनहिताच्या विषयांना प्राधान्य देत युवासेनेचे संघटन तळागाळापर्यंत पोहोचविण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.

No comments:

Powered by Blogger.