सौ. किरणताई संजय देरकर यांच्याकडून वणी विधानसभा क्षेत्रातील समस्त नागरिकांना दीपावलीच्या मंगलमय शुभेच्छा!
प्रशांत चंदनखेडे वणी :-
यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालिका, एकविरा महिला पतसंस्थेच्या अध्यक्षा, सन्मान स्त्रीशक्ती फाउंडेशनच्या संस्थापक अध्यक्षा तथा आमदार संजय देरकर यांच्या सुविद्य पत्नी सौ. किरणताई संजय देरकर यांच्या वतीने सर्वांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा!
साहेबांच्या विजयामागील प्रेरणाशक्ती... तर महिलांच्या स्वावलंबनाचा भक्कम आधार!
सकारात्मक विचार, भक्तिभाव, दृढ निश्चय, अढळ आत्मविश्वास आणि अथक प्रयत्नांच्या जोरावर आमदार संजय देरकर यांच्या राजकीय यशाच्या प्रवासात किरणताईंनी मोलाची भूमिका बजावली. अपयशाची मालिका खंडित करून साहेबांच्या विजयाचे स्वप्न साकारण्यात त्यांनी खंबीर साथ दिली. 'यशस्वी पुरुषाच्या मागे एका कर्तृत्ववान स्त्रीची ताकद असते' या उक्तीचा प्रत्यय त्यांनी आपल्या कार्यातून दिला.
राजकीय यशाच्या या प्रवासासोबतच सामाजिक बांधिलकीचा वसा जपत त्यांनी अनेक गोरगरीब व गरजू महिलांच्या आयुष्यात आशेचे नवे दीप उजळले आहेत. आर्थिक दुर्बल महिलांना आर्थिक मदत, निराधार महिलांना आधार, गरीब मुलींच्या शिक्षणासाठी मदतीचा हात आणि महिलांना स्वयंरोजगारासाठी प्रोत्साहन देत त्यांनी अनेक कुटुंबांच्या जीवनात आनंद निर्माण केला आहे.
महिलांच्या सुप्त गुणांना वाव मिळावा, त्यांच्यातील आत्मविश्वास जागृत व्हावा आणि त्यांनी स्वावलंबनाची वाट धरावी, यासाठी विविध सांस्कृतिक कार्यक्रम, स्पर्धा आणि सामाजिक उपक्रमांचे आयोजन त्यांनी केले. महिलांचे संघटन आणि सक्षमीकरणाचा ध्यास घेत त्यांनी त्यांच्या हक्कांसाठी तसेच अन्याय-अत्याचाराविरोधात निर्भीडपणे आवाज उठविला.
आमदार पत्नी आणि बँकेच्या संचालिका म्हणून महत्त्वाची जबाबदारी सांभाळतानाही त्यांनी साधेपणा, आपुलकी आणि सर्वसामान्यांशी असलेली नाळ कायम जपली आहे. लोकांची कामे करण्याची तळमळ, गरजूंच्या मदतीसाठी तत्परता आणि प्रत्येक सामाजिक कार्यात उत्स्फूर्त सहभाग हीच त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची खरी ओळख आहे.
ज्यांच्या प्रयत्नांनी महिलांच्या जीवनात आत्मविश्वासाचे दीप उजळले, ज्यांच्या आधाराने अनेक संसारांना नवी उमेद मिळाली आणि ज्यांच्या कर्तृत्वाने स्त्रीशक्तीला नवी दिशा मिळाली, अशा किरणताईंच्या सेवाभावी कार्याचा प्रकाश असाच सर्वदूर पसरत राहो!
या दीपावलीच्या मंगलपर्वावर प्रत्येकाच्या आयुष्यात सुख, समृद्धी, आरोग्य, आनंद आणि समाधानाचा प्रकाश नांदो. प्रत्येक घरात आनंदाचे दीप उजळोत आणि प्रत्येकाच्या स्वप्नांना यशाची नवी दिशा मिळो, हीच मनःपूर्वक सदिच्छा!
शुभ दीपावली! मंगलमय दीपोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा!


No comments: