क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले महिला समारोह समितीचा तहसील कार्यालयावर मोर्चा, मुख्यमंत्रांना पाठविले मागण्यांचे निवेदन

प्रशांत चंदनखेडे वणी महागाईचे चटके सोसणाऱ्या जनतेला राज्य शासनाने दिलासा देण्याकरिता गगनाला भिडलेल्या जिवनावश्यक वतुंच्या किंमती कमी कराव्या, या मागणीसह इतर काही मागण्यांना घेऊन क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले महिला समारोह समिती वणी, मारेगाव व झरीच्या वतीने काल २८ मार्चला तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. राज्य परिवहन महामंडळाच्या बस मधून प्रवास करणाऱ्या महिलांना टिकिट दरात ५० टक्के सूट देऊन शासनाने महिलांचा प्रवासखर्च कमी केला. त्याप्रमाणे गॅस सिलेंडरचे दरही ४०० ते ५०० रुपये करून जनतेला गृहखर्चात दिलासा द्यावा या मागणीसह इतर काही मागण्या उपविभागीय अधिकारी यांच्या मार्फत महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पाठविलेल्या निवेदनातून महिलांनी केल्या आहेत. महाराष्ट्र सरकारने नुकत्याच जाहीर केलेल्या अर्थसंकल्पात एसटी बस मधून प्रवास करणाऱ्या महिलांना टिकिट दरात ५० टक्के सूट जाहीर केली. शासनाचा हा अतिशय अभिनंदनीय निर्णय आहे. ज्याप्रमाणे महिलांना प्रवास खर्चात दिलासा दिला. त्याचप्रमाणे वाढत्या महागाईतून जनतेला दिलासा देण्याची मागणी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले महि...