नगर पालिकेचं दुर्लक्षित धोरण दिवसाढवळ्या पथदिवे सुरु तर नाल्यांची साफसफाई बंद
प्रशांत चंदनखेडे वणी
नगर पालिका प्रशासनाच्या दुर्लक्षितपणाचा फटका शहरवासीयांबरोबरच स्वतः नगर पालिकेलाही बसतांना दिसत आहे. नगर पालिका प्रशासन कोणतेही काम गंभीरतेने घेतांना दिसत नाही. मागील तीन दिवस विठ्ठलवाडी व गौरकार कॉलनी परिसरातील पथदिवे दिवसाढवळ्याही सुरूच होते. नगर पालिकेचा विद्युत विभाग भरदिवसा पथदिवे सुरु ठेऊन सूर्यप्रकाशाला आव्हान देतांना दिसत आहे. नगर पालिकेला पथदिव्यांच्या बिलाचा भरणाच करावा लागत नसल्यागत दिवसाढवळ्याही पथदिवे सुरु ठेवले जात आहे. तर दुसरीकडे नगर पालिका प्रशासनाचा दुर्लक्षितपणा नागरिकांचा मनःस्ताप वाढवू लागला आहे. शहरातील काही भागातील नाल्यांची मागील कित्येक दिवसांपासून साफसफाईच करण्यात आली नसल्याच्या तक्रारी नागरिकांमधून ऐकायला मिळत आहे. नाल्यांची साफसफाई न झाल्याने परिसरात दुर्गंधी पसरली असून डास व आजार पसरविणाऱ्या जंतूंची उत्पत्ती वाढली आहे. जागोजागी नाल्या तुंबल्याने घाण पाण्याची दुर्गंधी व डासांच्या प्रकोपाने नागरिक बेजार झाले आहेत. नगर पालिका प्रशासनाचं नाल्यांची साफसफाई व इतर मूलभूत सोई सुविधा पुरविण्याकडे दुर्लक्ष होऊ लागल्याने नागरिकांमध्ये कमालीचा असंतोष खदखदत आहे.मागील तीन दिवसांपासून विठ्ठलवाडी व गौरकार कॉलनी येथील पथदिवे दिवसाढवळ्याही सुरूच होते. आणि नगर पालिकेचा विद्युत विभाग निद्रावस्थेत होता. विद्युत विभागाला दिवस उजाडल्यानंतरही पथदिवे बंद करण्याचे भान रहात नाही, की नगर पालिका प्रशासनाची विभागांवरील पकड सैल झाली, हेच कळायला मार्ग नाही. नगर पालिकेला पथदिव्यांचे विजबिल भरावे लागत नसल्यागत दिवसालाही पथदिवे सुरु ठेवले जातात. जनतेचा पैसा वीज बिलावर उधळला जात असल्याची चर्चा आता शहरवासियांमधून ऐकायला मिळत आहे. नगर पालिका प्रशासनाचा दुर्लक्षितपणा आता नागरिकांच्या चर्चेचा विषय बनला आहे. दुसरीकडे काही परिसरात सोई सुविधांचा अभाव दिसून येत आहे. शहरातील काही भागातील नाल्यांची मागील काही दिवसांपासून साफसफाईच झाली नसल्याच्या तक्रारी ऐकायला मिळत आहे. नाल्यांची साफसफाई न झाल्याने जागोजागी नाल्या तुंबल्या आहेत. नाल्यांमध्ये घाणपाणी साचून रहात असल्याने डासांचा प्रकोप वाढला आहे. नाल्यांमध्ये साचलेल्या घाणपाण्यात आजार पसरविणाऱ्या विषाणूंची उत्पत्ती होऊ लागली आहे. त्यामुळे नागरिकांना विषाणूजन्य आजार होण्याचा धोका निर्माण झाला आहे. पूर्वी वेळोवेळी नाल्यांची साफसफाई व्हायची. परंतु आता नाल्यांच्या साफसफाईकडे नगर पालिकेचे दुर्लक्ष होतांना दिसत आहे. नगर पालिका प्रशासनाच्या या दुर्लक्षित धोरणामुळे शहरात अनेक समस्या निर्माण झाल्या असून नाल्यांची साफसफाई देखील करण्यात येत नसल्याने नागरिकांमधून संताप व्यक्त केला जात आहे. स्वच्छतेबाबत शहरवासीयांना धडे गिरविणाऱ्या नगर पालिकेचंच स्वच्छतेकडे दुर्लक्ष होऊ लागल्याने शहरात हा चर्चेचा विषय बनला आहे. नगर पालिकेने नाल्यांच्या साफसफाईकडे लक्ष देण्याची मागणी नागरिकांमधून होऊ लागली आहे.
Comments
Post a Comment