लग्नाचे आमिष दाखवून पाच वर्षांपासून तरुणीचे शारीरिक शोषण करणारा आरोपी गजाआड
प्रशांत चंदनखेडे वणी
प्रेमात अपेक्षाभंग झालेल्या प्रेमिकेने आपल्या प्रियकराविरुद्ध शारीरिक शोषणाची तक्रार नोंदविल्याने प्रियकराला अखेर तुरुंगाची हवा खावी लागली. २०१७ पासून सुरु असलेल्या प्रेम प्रकरणाचा शेवट पोलिस स्टेशनला दिलेल्या तक्रारीने झाला. तरुणीला प्रेमपाशात अडकवून तिला लग्नाचे आमिष दाखवून तिचे सतत शारीरिक शोषण करणाऱ्या प्रियकराविरुद्ध तिने पोलिस स्टेशनला दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी तिच्या प्रियकराला अटक केली आहे. लग्नाच्या भूलथापा देऊन तरुणीचे शारीरिक शोषण करणाऱ्या आरोपी विरुद्ध पोलिसांनी विविध कलमांन्वये गुन्हा दाखल केला आहे. ही कार्यवाही काल २३ मार्चला रात्री उशिरा करण्यात आली.
प्रेमात आखंड बुडाल्यानंतर ते प्रणयात लिन झाले. त्यांनी दीर्घकाळ एकमेकांच्या सहवासात घालविला. प्रेयसीने आपलं मन व तन दोन्ही त्याला अर्पण केलं. लग्न करण्याच्या आणाभाका घेतल्यानंतर प्रियकराने मात्र दगा दिला. तिने आपलं सर्वस्व त्याला अर्पण केलं, पण त्याने सर्पणाची भावना ठेवली नाही. लग्नाच्या भूलथापा देऊन त्याने पाच वर्ष तिचं शारीरिक शोषण केलं. शारीरिक संबंधातून गर्भधारणा झाल्यानंतर त्याने तिचा गर्भपातही करवून घेतला. शेवटी तिच्यापासून मन भरल्यानंतर त्याने तिच्याशी लग्न करण्याला साफ नकार दिला. केवळ शरीर सुखासाठी त्याने तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं. तर तिने त्याच्या शारीरिक भुकेला प्रेम समजून आपलं सर्वस्व बहाल केलं.
अखेर त्याने लग्नाला नकार देऊन तिच्या प्रेम भावनेचा अनादर केला. त्याच्या नकाराने तिचं भावविश्वच गळालं. तिच्या भावना दुखावल्या गेल्या. तिचा प्रेमभंग झाला. त्याने आपला शारीरिक उपभोग घेतल्याचे तिच्या लक्षात आले. त्याने शरीर सुखासाठी तिच्याशी प्रेमसंबंध निर्माण केल्याने तिच्यावर पश्चातापाची वेळ आली. शेवटी तिने लग्नाचे आमिष दाखवून शारीरिक शोषण करणाऱ्या प्रियकराविरुद्ध पोलिस स्टेशनला तक्रार नोंदविली. पोलिसांनी तिच्या तक्रारीवरून तिचे मागील पाच वर्षांपासून शारीरिक शोषण करणाऱ्या आरोपीला अटक केली. त्याच्यावर शारीरिक शोषण व अट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कासिब मोबीन रहेमान (२५) रा. काळे ले-आऊट असे या शारीरिक शोषण प्रकरणात अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
घराशेजारी राहणाऱ्या या दोघांच्या मनात प्रेमाचे अंकुर फुटले. कालांतराने प्रेम बहरत गेलं. दोघांचाही एकमेकांत जीव गुंतला. प्रेमात ते आखंड बुडाले. प्रेमातून नंतर त्यांच्यात भेटीगाठी वाढल्या. एकमेकांच्या सहवासात ते रमू लागले. सहवासातून शारीरिक संबंध निर्माण झाले. लग्नाच्या आणाभाका घेतल्या. त्याने तिला लग्न करण्याचं आश्वासन देऊन २०१७ पासून सतत तिचं शारीरिक शोषण केलं. वेळोवेळी त्याने तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित केल्याने तिला गर्भधारणा झाली. त्याने तिचा गर्भपातही करवून घेतला. त्यानंतरही त्याने तिचं शारीरिक शोषण सुरूच ठेवलं. तिने लग्नासाठी हट्टाहास धरला. पण तो नेहमी वेळ मारून न्यायचा. अखेर त्याने लग्नाला साफ नकार दिला. या त्याच्या नकाराने तिचं अवसानंच गळालं. शेवटी प्रेमात अपेक्षाभंग झालेल्या प्रेयसीने लग्नाचे आश्वासन देऊन शारीरिक शोषण करणाऱ्या प्रियकराविरुद्ध सरळ पोलिस स्टेशनला तक्रार नोंदविली. पोलिसांनी तरुणीच्या तक्रारीवरून तिचे शारीरिक शोषण करणारा आरोपी कासिब मोबिन रहेमान याला अटक करून त्याच्यावर भादंविच्या कलम ३७६(२)(N), ३१२, ४१७, ५०६, सहकलम ३(१)(w)(i), ३(१)(W)(ii), ३(२)(५A) अट्रोसिटी अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास एसडीपीओ संजय पुज्जलवार यांच्या मार्गदर्शनात पोलिस करीत आहे.
Comments
Post a Comment