देशी दारू दुकानात झालेल्या वादात एकाचा मृत्यू, जेवणाचा डब्बा डोक्यावर मारल्याचा व्यक्त केला जात आहे संशय



प्रशांत चंदनखेडे वणी

एका देशी दारू दुकानात दोघांमध्ये झालेला वाद विकोपाला जाऊन एकाने दुसऱ्याच्या डोक्यावर जेवणाचा डब्बा मारल्याने त्याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना वणी कोरपना मार्गावरील आबई फाटा येथे आज 23 मार्चला दुपारच्या सुमारास घडली. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. मृतक व संशयित मारेकरी दोघेही वेळाबाई या गावातील रहिवासी असल्याचे समजते. देशी दारू दुकानात मद्य सेवन केल्यानंतर दोघांमध्ये अनामिक कारणावरून वाद उफाळून आला. वादातून वाद वाढला व रागाच्या भरात एकाने जेवणाचा डब्बा दुसऱ्याच्या डोक्यावर मारला. मार वर्मी लागल्याने 55 वर्षीय इसम हा जागीच गतप्राण झाल्याची माहिती परिसरातून मिळाली आहे. सूर्यभान कुंभरे वय अंदाजे 55 वर्ष असे मृतकाचे नाव आहे. तर गावातीलच व्यक्तीने त्याच्या डोक्यावर जेवणाचा डब्बा मारल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. त्या संशयिताला शिरपूर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे  


मृतक व त्याच्यावर वार केल्याचा संशय असलेला इसम हे दोघेही वेळाबाई येथिल रहिवासी आहेत. दोघांचाही काही अनामिक कारणावरून वाद झाला. वाद विकोपाला जाऊन दोघांमध्ये हाणामारी झाली. या झटापटीत गावातीलच त्या व्यक्तीने रागाच्या भरात हातात असलेला जेवणाचा डब्बा ताकदीने सूर्यभान कुंभरे यांच्या डोक्यावर मारल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. वार वर्मी लागल्याने सूर्यभान कुंभारे जागीच गतप्राण झाल्याची चर्चा घटनास्थळी जमलेल्या नागरिकांमधून ऐकायला मिळत होती. एकाच गावातील रहिवासी असलेल्या या दोघांमध्ये नेमका कशावरून वाद झाला व जड वस्तू डोक्यावर मरण्याईतपत असं काय घडलं, हा आता चर्चेचा विषय बनला आहे. पोलिसांनी घटनस्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेतला. मृतदेह उत्तरीय तपासणी करीता वणी ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आला आहे. घटनेचा पुढील तपास शिरपूर पोलिस स्टेशनचे ठाणेदार गजानन करेवाड करीत आहे.

Comments

Popular posts from this blog

(Breaking News) वणी वरोरा महामार्गावर भीषण अपघात, दुचाकीस्वार तरुण जागीच ठार

नंदीग्राम एक्सप्रेसने कटून तरुणीचा मृत्यू, तरुणीने आत्महत्या केल्याचा संशय

वाहन चालकाचे नियंत्रण सुटले आणि झाला अपघात, एक महिला ठार तर आठ जण जखमी