वणीला परत येत असलेल्या डॉक्टर दाम्पत्याच्या कारला भिषण अपघात, डॉक्टर पती पत्नीचा दुर्दैवी मृत्यू
वणी वरोरा मार्गावरील शेंबड गावाजवळ ट्रकने कारला जोरदार धडक दिल्याने झालेल्या भिषण अपघातात डॉक्टर दाम्पत्याचा करुन अंत झाला. ही घटना आज 22 मार्चला दुपारच्या सुमारास घडली. वणी ग्रामीण रुग्णालयात नव्यानेच रुजू झालेल्या महिला डॉक्टर व वर्धा जिल्ह्यातील आर्वी येथे वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत असलेल्या त्यांच्या पतीचा या अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला. कामानिमित्त बाहेरगावी गेलेले हे डॉक्टर दाम्पत्य वणीला परत येत असताना त्यांच्या कारला ट्रकने जोरदार धडक दिली. या भिषण अपघात डॉ. अश्विनी (झाडे) गौरकर (३१) रा. नांदेपेरा रोड यांचा जागीच मृत्यू झाला. तर त्यांचे पती अतुल गौरकार यांचा रुग्णालयात नेत असताना मृत्यू झाला. आरोग्य सेवेतील तज्ञ डॉक्टरांचा गुढी पाडव्याच्या दिवशी असा हा अपघाती मृत्यू झाल्याने समाजमन हेलावलं आहे.
शहरात आज एका सुशिक्षित महिलेने आत्महत्या केल्याने हळहळ व्यक्त होत असतानाच एका महिला डॉक्टर तिच्या डॉक्टर पतीचा अपघातात दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडल्याने शहरात आज दुःखाची लाट पसरली आहे. वणी ग्रामीण रुग्णालयात नव्यानेच रुजू झालेल्या महिला डॉक्टर अश्विनी (झाडे) गौरकार व त्यांचे पती डॉ. अतुल गौरकार यांचा आज भिषण अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला. कामानिमित्त बाहेरगावी गेलेले डॉक्टर दाम्पत्य वणीला परत येत असताना त्यांच्या कारला(MH 34 AM 4240) ट्रकने (MH 34 BZ 2996) जोरदार धडक दिली. यात कार चालवित असलेल्या महिला डॉक्टरांचा जागीच मृत्यू झाला तर त्यांच्या पतीचा रुग्णालयात नेत असताना मृत्यू झाला. काही अंतरावर गाव असताना नियतीने डाव साधला व आरोग्य सेवेतील दोन तज्ञ डॉक्टर गमावण्याची वेळ जनतेवर आली. दोन डॉक्टर नियतीने हिरावून घेतले आहे. गुढी पाडव्याचा सन आनंदात साजरा करण्याची आकांक्षा बाळगून असलेल्या डॉक्टर दाम्पत्यावर काळाने घाला घातला, व क्षणात होत्याचं नव्हतं झालं. वाटेत दबा धरून बसलेल्या मृत्यूने घराच्या वाटेवर असलेल्या डॉक्टर दाम्पत्याला कायमचं हिरावून घेतलं. डॉक्टर दाम्पत्याचा असा हा दुर्दैवी अपघाती मृत्यू झाल्याने शहरात शोककळा पसरली असून शहरवासीयांमधून शोकसंवेदना व्यक्त होत आहेत. घटनेचा पुढील तपास पोलिस करीत आहे.
Comments
Post a Comment