वणी शहर व तालुक्यात आत्महत्यांचं सत्र थांबता थांबेना, आज एका महिलेने घेतला जगाचा निरोप
- Get link
- X
- Other Apps
प्रशांत चंदनखेडे वणी
शहरात आत्महत्यांचं सत्र सुरूच असून आत्महत्यांच्या घटना थांबता थांबत नसल्याने आप्तस्वकीयांमध्ये चिंतेचं वातावरण पसरलं आहे. जिवन नकोसे झाल्यागत नागरिक आत्महत्या करू लागल्याने हा आता एक चिंतेचा विषय बनला आहे. सतत होणाऱ्या आत्मात्यांनी तालुका हादरला आहे. एकाची चीता विझत नाही तोवर दुसऱ्याचं सरण रचावं लागत असल्याने आता चिंता व्यक्त केली जात आहे. या सतत होणाऱ्या आत्महत्या रोखण्याकरिता शासकीय व प्रशासकीय स्तरावर प्रयत्न होनं आता गरजेचं झालं आहे. नागरिकांमध्ये जीवनाविषयी सकारात्मक दृष्टिकोन निर्माण व्हावा याकरिता शासन, प्रशासनाकडून संमुपदेशन होनं गरजेचं झालं आहे. नागरिकांमध्ये जगण्याची ओढ निर्माण होईल याकरिता मेळाव्यांमधून मार्गदर्शन करणं आवश्यक झालं आहे. आज गुढी पाडव्याचा सन सर्वत्र साजरा होत असताना एका समृद्ध जिवन जगणाऱ्या महिलेने राहत्या घरी पंख्याला गळफास लावून जीवनाचा शेवट केला. आज 22 मार्चला सकाळी ही घटना उघडकीस आली. ही महिला घरी एकटीच राहायची. पतीचे गंभीर आजाराने दोन वर्षांपूर्वी निधन झाले. तर मुलगी अभियंता म्हणून बाहेरगावी नोकरीला आहे. ती देखिल एका इंग्रजी मध्यामिक विद्यालयात क्लर्क म्हणून नोकरीला होती. आज अचानक तिने गळफास घेऊन जगाचा निरोप घेतला. तिने असा हा टोकाचा निर्णय घेतल्याने तिच्या एकुलत्या एका मुलीला चांगलाच धक्का बसला आहे. रश्मी शरद हस्तक (४७) रा. विठ्ठलवाडी असे या गळफास घेऊन मृत्यूला कवटाळलेल्या महिलेचे नाव आहे.
आज गुढी पाडव्याचा सन असल्याने तिने पहाटे लवकर उठून अंगणात पाणी शिंपले. नातलागांसोबत वार्तालाप देखिल केला. सगळं काही सुरळीत होतं. सुखी समृद्ध जिवन जगत असलेल्या महिलेने आज अचानक गळ्याभोवती मृत्यूचा फास आवळला. सकाळी या महिलेला तिची मुलगी फोन करत असताना तिला आई कडून प्रतिसाद न मिळाल्याने तिने शेजारच्याना फोन करून आईची चौकशी करण्यास सांगितले. शेजाऱ्यांना महिलेच्या घराचे दार आतून बंद दिसले. त्यांनी दार ठोठावले असता त्यांनाही आतून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे शेजाऱ्यांनी एकत्र येत दाराला धक्का दिला. त्यांनी घरात जाऊन बघतले असता त्यांनाही चांगलाच धक्का बसला. रश्मी बेडरूम मध्ये पंख्याला घळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आली. शेजाऱ्यांनी ही माहिती लगेच नातलगांना दिली. नातलगांनी मृतक महिलेच्या घराकडे घाव घेत पोलिसांना घटनेबाबत माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळ गाठून घटनास्थळाचा पंचनामा करीत मृतदेह उत्तरीय तपासणी करीता ग्रामीण रुग्णालयात पाठविला. सुशिक्षित महिलेने असा हा टोकाचा निर्णय घेतल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. मृतक रश्मी हस्तक हिच्या पश्चात एक मुलगी आहे. तिच्या आत्महत्येचे कारण अद्याप गुलदस्त्यात असून पोलिस तपास करीत आहे.
- Get link
- X
- Other Apps
Comments
Post a Comment