वाहतूक पोलिसांनी शहरात हेल्मेट घालून काढली मोटरसायकल रॅली, रॅलीत अनेकांनी दर्शविला सहभाग



प्रशांत चंदनखेडे वणी 

मोटारसायकलचे अपघात प्रचंड वाढल्याने सुरक्षेचा उपाय म्हणून मोटारसायकलस्वारांनी हेल्मेटचा वापर करणे अति आवश्यक झाले आहे. मोटरसायकलने कुठेही जायचे झाल्यास हेल्मेट घालणे सुरक्षेच्या दृष्टीने जरुरी असून हेल्मेटमुळे अपघातात आपला बचाव होऊ शकतो. हेल्मेट वापराबाबत दुचाकीस्वारांमध्ये जनजागृती करण्याकरिता आज २३ मार्चला सकाळी १० वाजता वाहतूक पोलिसांनी  हेल्मेट घालून शहरातून मोटरसायकल रॅली काढली. वणी वाहतूक शाखेच्या वतीने काढण्यात आलेल्या या रॅलीने शहरवासीयांचे लक्ष वेधले. हेल्मेट घालून काढण्यात आलेल्या या मोटरसायकल रॅलीत वाहतूक पोलिसांबरोबरच पत्रकार, विद्यार्थी व जागरूक नागरिकही सहभागी झाले होते. शासकीय मैदानावरून या रॅलीला सुरुवात झाली. शहरातील प्रमुख मार्गाने भ्रमण करीत ही रॅली वणी वाहतूक शाखा येथे पोहचल्यानंतर या रॅलीचा समारोप झाला. वाहतूक नियंत्रण उपशाखा वाणीचे पोलिस उपनिरीक्षक संजय आत्राम यांच्या नेतृत्वात काढण्यात आलेल्या या रॅलीला एसडीपीओ संजय पुज्जलवार यांनी हिरवी झंडी दाखविली.
 

शहर व तालुक्यात मोटरसायकल अपघातांच्या घटनांमध्ये कमालीची वाढ झाली आहे. दुचाकी अपघातात डोक्याला मार लागून अनेकांना आपले जीव गमवावे लागले. त्यामुळे दुचाकी अपघातात डोक्याला मार लागून मेंदूला इजा होऊ नये याकरिता दुचाकीने प्रवास करतांना हेल्मेट घालणे गरजेचे आहे. हाच संदेश दुचाकीस्वारांपर्यंत पोहचविण्याकरिता आज वणी वाहतूक शाखेच्या वतीने शहरातून हेल्मेट घालून मोटरसायकल रॅली काढण्यात आली. जिल्हा पोलिस अधीक्षक पवन बन्सोड, अप्पर पोलिस अधीक्षक पियुष जगताप, एसडीपीओ संजय पुज्जलवार यांच्या मार्गदर्शनात व वाहतूक नियंत्रण उपशाखा वणीचे पोलिस उपनिरीक्षक संजय आत्राम यांच्या नेतृत्वात ही मोटरसायकल रॅली काढण्यात आली. अनेक जन या मोटरसायकल रॅलीत हेल्मेट घालून सहभागी झाले होते. 


Comments

Popular posts from this blog

(Breaking News) वणी वरोरा महामार्गावर भीषण अपघात, दुचाकीस्वार तरुण जागीच ठार

नंदीग्राम एक्सप्रेसने कटून तरुणीचा मृत्यू, तरुणीने आत्महत्या केल्याचा संशय

वाहन चालकाचे नियंत्रण सुटले आणि झाला अपघात, एक महिला ठार तर आठ जण जखमी