पोलिसांनी अवैध धंद्यांवर उगारला कार्यवाहीचा बडगा, एकता नगर परिसरातील मटका अड्ड्यावर केली कार्यवाही


प्रशांत चंदनखेडे वणी 

वणी पोलीस स्टेशन हद्दीत कोणत्याही प्रकारचे अवैध सुरु राहणार नाही, असे सक्त आदेश जिल्हा पोलिस अधीक्षकांनी दिल्याने पोलिसांनी अवैध धंद्यांवर कार्यवाहीचा बडगा उगारला आहे. मटका अड्डे चालविणाऱ्यांवर कार्यवाहीची मोहीमच हाती घेतली आहे. कोंबड बाजारांवरही धाड सत्र अवलंबलं आहे. अवैध व्यवसायिकांवर पोलिसांचं बारीक लक्ष असून अवैध व्यवसायांबाबत माहिती मिळवून पोलिसांकडून धडक कार्यवाही केली जात आहे. मटका अड्डे चालविण्यात येणाऱ्या ठिकाणी पोलिस तैनात करण्यात आले आहे. अवैध व्यवसायातून मालदार झालेले परत अवैध व्यवसायाकडे वळू लागल्याने कोंबड बाजार आणखीच रंगात येणार असल्याच्या चर्चांना ऊत आले. आणि पोलिसांनी कोंबड बाजारच उधळून लावला. त्यानंतर पोलिस स्टेशन हद्दीतील अवैध धंद्याचं समूळ उच्चाटन करण्याचा अजेंडा राबविण्यात आला. काल ३० डिसेंबरला एकता नगर परिसरात छुप्या पद्धतीने सुरु असलेल्या मटका जुगारावर पोलिसांनी कार्यवाही करीत मटका पट्टी फाडणाऱ्या एकाला अटक केली. त्याला पोलिसांनी मटका अड्डा चालविणाऱ्याचे नाव विचारले असता त्याने अभय उर्फ छोटू होले असे सांगितले. पोलिसांनी दोघांवरही गुन्हा दाखल केला आहे. 

एकता नगर परिसरात छुप्या पद्धतीने मटका अड्डा चालविला जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी त्याठिकाणी जाऊन पाहणी केली असता तेथे एक इसम मटका पट्टी फाडतांना आढळून आला. लोकांकडून पैसे घेऊन कागदावर मटक्याचे आकडे लिहून देणाऱ्या इसमाला पोलिसांनी रंगेहात अटक केली. पोलिसांनी त्याला त्याचे नाव विचारले असता त्याने दयाराम फते यादव (४८) रा. राजूर (कॉ.) असे सांगितले. त्याला मटका अड्डा चालविणाऱ्याचे नाव विचारले असता त्याने अभय उर्फ छोटू होले असल्याचे सांगितले. पोलिसांनी दोघांवरही मजुकाच्या कलम १२(अ) नुसार गुन्हा दाखल आला आहे. पुढील तपास पोलिस करीत आहे. 

Comments

Popular posts from this blog

(Breaking News) वणी वरोरा महामार्गावर भीषण अपघात, दुचाकीस्वार तरुण जागीच ठार

नंदीग्राम एक्सप्रेसने कटून तरुणीचा मृत्यू, तरुणीने आत्महत्या केल्याचा संशय

वाहन चालकाचे नियंत्रण सुटले आणि झाला अपघात, एक महिला ठार तर आठ जण जखमी