Latest News

Latest News
Loading...

शिक्षकाची विषारी द्रव्य प्राशन करून आत्महत्या


प्रशांत चंदनखेडे वणी 

वणी तालुक्यातील कायर येथे वास्तव्यास असलेल्या शिक्षकाने विषारी द्रव्य प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना आज १० मार्चला दुपारी १.३० वाजताच्या सुमारास कायर जवळील हुडकेश्वर मंदिर परिसरात उघडकीस आली. बळवंत कवडूजी जुमनाके (३५)  असे या आत्महत्या केलेल्या शिक्षकाचे नाव आहे. तो कायर येथीलच एका खाजगी शाळेत शिक्षक होता. आज दुपारी तो हुडकेश्वर मंदिर परिसरात विषारी द्रव्य प्राशन केलेल्या अवस्थेत आढळून आला. याबाबत पोलिसांना माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळ गाठून मृतदेह उत्तरीय तपासणी करिता ग्रामीण रुग्णालयात पाठविला. 

तालुक्यात आत्महत्यांचे सत्र सुरूच असून आज आणखी एका शिक्षकाने विषारी द्रव्य प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. कायर येथे वास्तव्यास असलेल्या व तेथीलच एका खाजगी शाळेत शिक्षक असलेल्या बळवंत जुमनाके यांनी विषारी द्रव्य प्राशन करून आत्महत्या केली. ते कायर जवळील हुडकेश्वर मंदिर परिसरात विषारी द्रव्य प्राशन केलेल्या अवस्थेत आढळून आले. त्यांनी विषारी द्रव्य प्राशन केल्याची माहिती कुटुंबियांना देण्यात आली. कुटुंबीयांनी तात्काळ घटनास्थळाकडे धाव घेतली. मात्र त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाल्याचे कुटुंबियांच्या लक्षात लक्षात आले. घटनेची माहिती शिरपूर पोलिसांना देण्यात आल्यानंतर पोलिस तात्काळ घटनास्थळी पोहचले. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणी करीता ग्रामीण रुग्णालयात पाठविला. शिक्षकाच्या आत्महत्येचे कारण अद्याप गुलदस्त्यात असून पोलिस त्यांच्या आत्महत्या करण्यामागच्या कारणांचा शोध घेत आहे. शिक्षकी पेशा असलेल्या व्यक्तीने असा हा आत्महत्येसारखा टोकाचा निर्णय घेतल्याने गावकऱ्यांमधून हळहळ व्यक्त केली जात आहे. त्यांच्या आत्महत्त्या करण्याने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. घटनेचा पुढील तपास शिरपूर पोलिस करीत आहे. 

No comments:

Powered by Blogger.