ट्रकची ऑटोला जोरदार धडक, ऑटो चालक जागीच ठार

प्रशांत चंदनखेडे वणी 

कोळशाची इंटरनल शिफ्टिंग करणाऱ्या भरधाव ट्रकने ऑटोला जोरदार धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात ऑटो चालक जागीच ठार झाल्याची घटना काल १० मार्चला रात्री १० वाजताच्या सुमारास वणी यवतमाळ मार्गावरील पळसोनी फाट्यावर घडली. वणी वरून राजूरकडे येत असलेल्या ऑटोला कोळशाची चुरी भरण्याकरिता लालपुलियाकडे जात असलेल्या भरधाव ट्रकने जोरदार धडक दिली. या धडकेत ऑटोचा पार चुराडा झाला असून ऑटो चालक राम खिलावन बसई प्रसाद (३८) रा. राजूर (कॉ.) हा जागीच ठार झाला आहे. 

मुख्य मार्गांवर अपघाताचे प्रमाण प्रचंड वाढले असून अनियंत्रित वाहतुक अपघातास कारणीभूत ठरू लागली आहे. वाहतुकीला शिस्त लावण्यात व वाहनांच्या वेगाला आवर घालण्यात वाहतूक पोलिस सपशेल अपयशी ठरताना दिसत आहे. वणी वरून राजूरला जात असलेल्या ऑटोला (MH 29 V 8144) कोळशाची अंतर्गत वाहतूक करणाऱ्या भरधाव ट्रकने (MH 34 AB 9523) जोरदार धडक दिली. या धडकेत ऑटोचा पार चुराडा झाला आहे. या अपघातात ऑटो चालक राम खिलावन बसई प्रसाद हा जागीच ठार झाला. अपघाताची माहिती पोलिसांना मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळाकडे धाव घेतली. घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणी करीता ग्रामीण रुग्णालयात पाठविला. घटनेचा पुढील तपास पोलिस करीत आहे. 

Comments

Popular posts from this blog

(Breaking News) वणी वरोरा महामार्गावर भीषण अपघात, दुचाकीस्वार तरुण जागीच ठार

नंदीग्राम एक्सप्रेसने कटून तरुणीचा मृत्यू, तरुणीने आत्महत्या केल्याचा संशय

वाहन चालकाचे नियंत्रण सुटले आणि झाला अपघात, एक महिला ठार तर आठ जण जखमी