टीडीआरएफ द्वारा महिला दिन साजरा, विविध क्षेत्रातील महिलांचा करण्यात आला सत्कार

प्रशांत चंदनखेडे वणी 

टीडीआरएफ (आपत्ती प्रतिसाद दल) द्वारा जागतिक महिला दीना निमित्त टीडीआरएफ उपविभागीय अधिकारी कार्यालय येथे महिलांच्या सन्मानार्थ कार्यक्रम घेण्यात आला. टीडीआरएफच्या संचालक रुपाली राठोड यांच्या पुढाकारातून घेण्यात आलेल्या या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून पोलिस उपनिरीक्षक अश्विनी रायबोले, टीडीआरएफ मुख्य क्षेत्रीय अधिकारी मुस्कान सय्यद यांची उपस्थिती लाभली. या कार्यक्रमात विविध क्षेत्रात कार्यरत महिलांचा तसेच टीडीआरएफ मध्ये कार्यरत असलेल्या महिलांचा सन्मान करण्यात आला. 

कार्यक्रमाचे प्रास्ताविक करतांना मुस्कान सय्यद यांनी टीडीआरएफने सुरक्षेच्या दृष्टीने केलेल्या १९ वर्षाच्या कार्याचा इतिहास उपस्थितांसमोर मांडला. यावेळी पोलिस उपनिरीक्षक अश्विनी रायबोले यांनी महिलांना मार्गदर्शन करतांना म्हटले की, महिलांनी आपल्या सुरक्षेच्या दृष्टीने सजग असलं पाहिजे. आपली सुरक्षा कशी करायची याचे धडे व प्रशिक्षण घेतलं पाहिजे. महिलांनी स्वनिर्भर बनून आत्मरक्षण करण्याची गरज निर्माण झाली असल्याचे सांगतानाच त्यांनी टीडीआरएफ मधील मुलींच्या कार्याचे कौतुक केले. टीडीआरएफ मध्ये सुद्धा मुली आत्मसुरक्षा व नागरीसुरक्षेचे प्रशिक्षण घेत आहेत. ही अभिमानास्पद बाब आहे. टीडीआरएफ जवानांनी असेच समाज व राष्ट्रकार्यासाठी अग्रेसर रहावे, व इतरांना मदत करावी अशी अपेक्षा अश्विनी रायबोले यांनी यावेळी व्यक्त केली.

या कार्यक्रमात विविध क्षेत्रात कार्यरत असलेल्या व टीडीआरएफ मधील महिलांचा पोलिस उपनिरीक्षक अश्विनी रायबोले यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. यावेळी संजीवनी खिरटकर, नुजत शेख, संगीता टेंभूर्डे, साक्षी मुजगेवार, अंजली उगवे, हिमांशी बदकल, वेदिका उरले या विविध क्षेत्रात कार्यरत असलेल्या महिलांना त्यांच्या कार्याबद्दल सन्मानित करण्यात आले. तसेच टीडीआरएफ मधील सानिका सोनटक्के, सृष्टी दडमल, ख़ुशी सिडाम, श्रेया बावणे, अस्मिता वाळके, संजना देवगडे, किरण आत्राम, किरण चव्हाण या महिलांचा देखील यावेळी सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाला विजया ठाकरे, सोनल बावणे, अश्विनी रामगिरवार, अर्चना मजगेवार, पिंकी अग्रवाल दामिनी बल्की आदी महिला व टीडीआरएफ जवान मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यस्वीतेकरिता टीडीआरएफ वणी पथकाने परिश्रम घेतले. 

Comments

Popular posts from this blog

(Breaking News) वणी वरोरा महामार्गावर भीषण अपघात, दुचाकीस्वार तरुण जागीच ठार

नंदीग्राम एक्सप्रेसने कटून तरुणीचा मृत्यू, तरुणीने आत्महत्या केल्याचा संशय

वाहन चालकाचे नियंत्रण सुटले आणि झाला अपघात, एक महिला ठार तर आठ जण जखमी