उन्हाळा सुरु झाल्याने निर्गुडा नदीचा प्रवाह थांबला, निर्माण झाले जलसंकट, नवरगाव धरणातील पाणी नदीत सोडण्याची मागणी

प्रशांत चंदनखेडे वणी 

वणी तालुक्यातील अनेक गावांची तहान भागविणारी निर्गुडा नदी उन्हाळ्यातील उष्णतामान वाढू लागल्याने आटू लागली आहे. नदीचा प्रवाह खुंटला असून नदीचे पात्र कोरडे पडू लागले आहे. नदीचे पाणी स्थिरावल्याने नदीत पाण्याचे डबके तयार झाल्याचे दिसून येत आहे. नदीत तयार झालेल्या पाण्याच्या डबक्यांमध्ये श्वान आणि वराह स्वछंद विहार करीत असल्याने पाणी दूषित होऊ लागले आहे. एवढेच नाही तर नदीतील पाण्याची दुर्गंधी देखील येऊ लागली आहे. त्यामुळे नदीचे पाणी मनुष्याच्या तर सोडाच पाळीव जनावरांनाही पिण्यायोग्य राहिलेले नाही. निर्गुडा नदीचा प्रवाह खुंटल्याने तालुक्यात भीषण पाणी टंचाईचे संकट निर्माण होण्याची चिन्हे दिसू लागली आहे. अनेक गावांना पाणी टंचाईची झळ बसणार असल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. निर्गुडा नदीचे पाणी आटू लागल्याने अनेक गावांवर जल संकट ओढविण्याची शक्यता निर्माण झाली असून शेतकऱ्यांचाही शेत सिंचनाचा प्रश्न निर्माण होणार आहे. पाण्याअभावी पशुधनही संकटात येण्याची भीती वर्तविण्यात येत आहे. त्यामुळे नवरगाव धरणातील जलाशय तात्काळ निर्गुडा नदीत सोडण्याची मागणी माजी जिल्हा परिषद सदस्य विजय पिदूरकर यांनी तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे. 

माजी जि. प. सदस्य विजय पिदूरकर यांनी जनतेचे प्रश्न व समस्या सोडविण्याकरिता नेहमी पुढाकार घेतला. सत्ताधारी पक्षाचे नेते असतांनाही त्यांनी जनतेच्या प्रश्नांना घेऊन वेळोवेळी आवाज उठविला. जनतेचे प्रश्न व समस्या प्रशासनापुढे मांडतांनाच त्यांनी वेळ प्रसंगी आंदोलनात्मक भूमिकाही घेतल्या आहेत. नागरिकांच्या समस्यांचे निराकरण करण्याकरिता त्यांनी प्रशासनावर दबाव आणून त्यांना समस्या सोडविण्यास भाग पाडले आहे. शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्याकरिता ते नेहमीच तत्पर असतात. उन्हाळ्यात गुंज नाल्याची पाण्याची पातळी खालावली जात असल्याने शेतकऱ्यांपुढे ओलिताचे मोठे संकट निर्माण होते. शेतातील ओलितासाठी गुंज नाल्याच्या पाण्यावर विसंबून असलेल्या शेतकऱ्यांवर ओलिताचे संकट ओढवणार असल्याचे लक्षात येताच विजय पिदूरकर यांनी निलजई कोळसाखानीतील पाणी गुंज नाल्यात सोडण्याची मागणी प्रशासनाकडे लावून धरली आहे. आता त्यांनी निर्गुडा नदीतील पाण्याची पातळी कमी झाल्याने नवरगाव धरणातील पाणी निर्गुडा नदीत सोडण्याची मागणी केली आहे. 

निर्गुडा नदीतील पाण्याचा प्रवाह स्थिरावला आहे. नदीत पाण्याचे डबके तयार झाले आहेत. नदीतील वाहते पाणी खाचखळग्यात जमा झाल्यागत दिसत आहे. या खाचखळग्यातील पाण्यात श्वान व वराह डुबक्या मारतांना दिसत आहे. त्यामुळे पाणी दूषित होऊन पाण्याची दुर्गंधी येऊ लागली आहे. हे पाणी पशुधनासाठीही पिण्यायोग्य राहिलेले नाही. पुनवट, कवडशी, सावंगी या गावाजवळून वाहणाऱ्या निर्गुडा नदीचं पात्र कोरडं पडू लागलं आहे. निर्गुडा नदीच्या पाण्यावर तालुक्यातील अनेक गावे विसंबून आहेत. पशुधनाची पिण्याच्या पाण्याची गरजही निर्गुडा नदीच भागवत असल्याने निर्गुडा नदीचं पात्र वाहतं असणं गरजेचं आहे. नदीचा प्रवाह खुंटल्यास पशुधनाच्या संगोपनाचा बिकट प्रश्न निर्माण होईल. परिणामी दुग्ध व्यवसायही धोक्यात येईल. नदीचा स्रोत आटल्याने पशुपालकांसमोर पशुपालनाचा प्रश्न निर्माण होईल. त्यांचे पशु पालन करणेच कठीण होईल. तसेच शेत सिंचनाचेही प्रश्न निर्माण होतील. कास्तकारांवर ओलिताचे संकट निर्माण होऊन खरीप पिकांचं मोठं नुकसान होईल. वणी पासून तर वागदरा, मंदर, चारगाव, वारगाव, शिरपूर, शेलू, पुरड, पुनवट, नवेगाव, कवडशी, सावंगी व शिवणी या नदी काठावरील गावांची उन्हाळ्यातील पाण्याची गरज निर्गुडा नदीतील पाण्यामुळेच भागते. त्यामुळे निर्गुडा नदीचा प्रवाह निरंतर वाहता असणे नितांत गरजेचे आहे. परंतु उन्हाळा सुरु झाल्याने निर्गुडा नदी आटू लागली आहे. नदी काठावरील गावांना पाण्याची टंचाई भासू लागली आहे. पशुधनाच्या पिण्याच्या पाण्याचाही प्रश्न गंभीर झाला आहे. निर्गुडा नदीच्या पाण्यावर नागरिकांचं जलजीवन अवलंबून आहे. त्यामुळे नवरगाव धरणातील पाणी तात्काळ निर्गुडा नदीत सोडण्याची मागणी माजी जी.प. सदस्य विजय पिदूरकर यांनी केली आहे.  

Comments

Popular posts from this blog

(Breaking News) वणी वरोरा महामार्गावर भीषण अपघात, दुचाकीस्वार तरुण जागीच ठार

नंदीग्राम एक्सप्रेसने कटून तरुणीचा मृत्यू, तरुणीने आत्महत्या केल्याचा संशय

वाहन चालकाचे नियंत्रण सुटले आणि झाला अपघात, एक महिला ठार तर आठ जण जखमी