महाशिवरात्रीच्या जत्रेवरून परतणाऱ्या तरुणांना सुटला आंघोळीचा मोह, आणि तीन तरुण वर्धा नदीच्या प्रवाहात गेले वाहून
प्रशांत चंदनखेडे वणी
वरोरा तालुक्यातील भटाळी येथे शंकरजीचे भव्य मंदिर असून महाशिवरात्रीनिमित्त याठिकाणी भव्य जत्रा भरत असल्याने शहरातील विठ्ठलवाडी परिसरातील १० ते ११ तरुण भटाळी येथे शंकरजीच्या दर्शनाकरिता गेले होते. दरम्यान परतीच्या प्रवासात वर्धा नदीच्या पाटाळा पुलावरील नदी पात्रात या तरूणांना आंघोळ करण्याचा मोह सुटला. हे सर्वच तरुण नदी पात्रात उतरले. पण अंघोळ करतांनाच प्रवाहाचा अंदाज चुकल्याने हर्ष चाफले हा तरुण नदीच्या प्रवाहात वाहू लागला. तो प्रवाहात वाहत असल्याचे पाहून त्याचा चुलत भाऊ अनिरुद्ध चाफले हा त्याला वाचविण्याकरिता गेला असता तोही प्रवाहात वाहू लागल्याने संकेत नगराळे या तरुणाने त्यांना वाचविण्याचा प्रयत्न केला. पण तिघेही वर्धा नदीच्या प्रवाहात वाहून गेल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. या तिघांचाही अद्याप शोध लागला नसून रात्र झाल्याने शोध मोहीम थांबविण्यात आली आहे. पहाटे तडक वर्धा नदीत शोध मोहीम राबविण्यात येणार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.
शहरातील विठ्ठलवाडी परिसरातील मित्र महाशिवरात्रीनिमित्त वरोरा तालुक्यातील भटाळी येथे शंकरजीच्या दर्शनाकरिता गेले होते. भटाळी वरून परत येतांना त्यांना मार्गातील वर्धा नदीवर आंघोळीचा मोह सुटला. हे सर्वच मित्र वर्धा नदी पात्रात आंघोळी करीता गेले. दरम्यान आंघोळ करतांना पाण्याचा अंदाज न आल्याने हर्ष अतिश चाफले वय अंदाजे १६ ते १७ वर्ष हा प्रवाहात वाहू लागला. तो प्रवाहात वाहत असल्याचे पाहून त्याचा चुलत भाऊ अनिरुद्ध सतिश चाफले वय अंदाजे २२ ते २३ वर्ष हा त्याला वाचविण्यासाठी गेला असता तोही प्रवाहात वाहू लागला. हे दोघेही नदीच्या प्रवाहात वाहत असल्याचे पाहून संकेत पुंडलिक नगराळे वय अंदाजे २६ ते २७ वर्ष याने त्यांना वाचविण्याचा प्रयत्न केला. पण तो देखिल प्रवाहात वाहून गेल्याचे सांगण्यात येत आहे. संकेत हा वेकोलि कर्मचाऱ्याचा मुलगा असून हर्ष व अनिरुद्ध हे लोडर ऑपरेटर म्हणून काम करणाऱ्या कामगारांची मुले आहेत. विठ्ठलवाडी येथे वास्तव्यास असलेल्या मित्रांचा समूह महाशिवरात्रीनिमित्त जत्रा पाहायला भटाळी गेला होता. पण परतीच्या प्रवासात हा हृदयद्रावक प्रसंग घडला. पुढील तपास पोलिस करीत आहे.
हर्ष अतिश चाफले हा १० विचा विद्यार्थी असून त्याची परीक्षा सुरु आहे. तो मित्रांसोबत महाशिवरात्री निमित्त भटाळी येथे जत्रा पाहण्याकरीता गेला होता. परंतु परतीच्या परावासात तो मित्रांसोबत अंधोळ करण्याकरिता वर्धा नदी पात्रात उतरला आणि वाहून गेला. तसेच त्याचा चुलत भाऊ अनिरुद्ध चाफले हा १२ चा विद्यार्थी असल्याचे सांगण्यात येते. भावाला वाचविण्याच्या प्रयत्न दोघेही भाऊ वाहून गेल्याने कुटुंबं दुःख सागरात बुडालं आहे. तर या दोघांनाही वाचविण्याच्या प्रयत्नात संकेत नगराळे हा वाहून गेल्याचे सांगण्यात येत आहे. या घटनेने विठ्ठलवाडी परिसरात शोककळा पसरली असून तरुणांच्या अशा या दुर्दवी मृत्यूने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
No comments: