Latest News

Latest News
Loading...

झरी तालुका व मार्डी सर्कलमध्ये संजय खाडे यांचा वादळी प्रचार, ठिकठिकाणी घेण्यात आल्या कॉर्नर सभा


प्रशांत चंदनखेडे वणी 

काँग्रेस मधून बंडखोरी करीत वणी मतदार संघात अपक्ष उमेदवारीने आव्हान उभे करणाऱ्या संजय खाडे यांच्या प्रचाराने प्रमुख राजकीय पक्षांच्या उमेदवारांमध्ये धडकी भरविली आहे. संजय खाडे यांचे झंझावाती प्रचार दौरे सुरु आहेत. गावागावांमध्ये कॉर्नर सभाही घेतल्या जात आहे. कार्यकर्ते व समर्थक त्यांच्या प्रचाराला जोमाने भिडले आहेत. महिला शक्तींनीही त्यांच्या प्रचाराची कमान सांभाळली आहे. महिलाही मोठ्या प्रमाणात संजय खाडे यांच्या प्रचारार्थ मैदानात उतरल्या आहेत. जेष्ठ नागरिक मंडळ व बँक अभिकर्त्यांनी संजय खाडे यांना जाहीर पाठिंबा दर्शविला आहे. तसेच विविध आदिवासी संघटना व धनगर नेत्यांनीही संजय खाडे यांना पाठिंबा दर्शविला. संजय खाडे यांनी झरी तालुका पिंजून काढत झरीसह मुकुटबन व गावागावात प्रचाराचा धुराळा उडविल्यानंतर काल १३ नोव्हेंबरला मार्डी सर्कलमध्ये वादळी प्रचार करण्यात आला. मार्डी सर्कलमध्ये ठिकठिकाणी कॉर्नर सभा घेण्यात आल्या. संजय खाडे यांचा यावेळी जोरदार प्रचार करण्यात आला. बुधवारी सकाळी ८ वाजता वनोजादेवी मंदिरात दर्शन घेऊन प्रचाराला सुरुवात करण्यात आली. 
अपक्ष उमेदवार संजय खाडे यांनी मार्डी सर्कलमध्ये जोरदार प्रचार केला. यावेळी कार्यकर्ते, समर्थक, महिलाशक्ती व गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. मार्डी सर्कल मधील गोरज, दांडगाव, आपटी, मुक्टा, हिवरा, कानडा, शिवणी धोबे, चनोडा, चोपण या गावांमध्ये झंझावाती प्रचार करण्यात आला. गोरज व दांडगाव येथे ढोलताशाच्या गजरात भव्य रॅली काढण्यात आली. या रॅलीत गावकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. यावेळी संजय खाडे यांच्या प्रचाराला नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळाला. दरम्यान संजय खाडे यांनी गावकऱ्यांशी संवाद साधला. त्यानंतर प्रचार ताफा आपटी, मुक्टा, हिवरा, कानडा, शिवणी धोबे, चनोडा, चोपण येथे पोहचला. येथील प्रचार आटोपल्यानंतर मार्डी येथे कॉर्नर सभा घेऊन मार्डी सर्कलच्या प्रचाराची सांगता करण्यात आली. या प्रचार दौऱ्यात माजी आमदार विश्वास नांदेकर,जेष्ठ नेते नरेंद्र ठाकरे हे प्रामुख्याने सहभागी झाले होते. त्यांनी यावेळी सत्ताधाऱ्यांवर जोरदार हल्लाबोल केला. 

शेतकरी सुखी असेल तर आत्महत्या का ? - संजय खाडे

भाजपच्या 10 वर्षांच्या काळात मतदारसंघात जो विकास व्हायला पाहिजे तो झालेला नाही. शेतक-यांना न्याय मिळाला नाही. शेतक-यांना वीज मिळत नाही. ग्रामीण भागात बसची समस्या आहे. बेरोजगारांची फौज परिसरात वाढत आहे. ग्रामीण भागातील रस्त्याची समस्या बिकट आहे. मारेगाव तालुक्यात शेतक-यांच्या सर्वांधिक आत्महत्या आहेत. शेतकरी जर सुखी असता तर त्याच्यावर आत्महत्या करण्याची वेळ आली नसती, अशी उद्विग्नता त्यांनी या सभेतून व्यक्त केली. सभेत बोलताना नरेंद्र ठाकरे म्हणाले की संजय खाडे हे काँग्रेसचे एकनिष्ठ कार्यकर्ते आहे. यावेळी काँग्रेस निवडणुकीत नाही. त्यामुळे काँग्रेस कार्यकर्ता नाराज आहे. काँग्रेस जिवंत राहण्यासाठी आमचा प्रयत्न आहे. काँग्रेसचा सर्वसामान्य कार्यकर्ता खाडे यांच्या पाठिशी उभा राहिल, असा विश्वास त्यांनी सभेत व्यक्त केला.

झरी येथे क्रांतीवीर बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेला हारार्पण करून कॉर्नर सभेला सुरुवात झाली. येथे संजय खाडे यांनी आदिवासी समाजातील विविध समस्यांवर प्रकाश टाकला. मतदारसंघात अनेक मोठमोठे विकासाचे दावे होत आहेत. मात्र अजूनही झरीसारख्या दुर्गम भागात, आदिवासी पोडात पुरेशा सोयी सुविधा पोहचल्या नाहीत. शिक्षण, आरोग्य सेवा, रस्ते, वीज, स्वच्छ पाणी या मूलभूत सुविधादेखील त्यांना मिळत नाही. आरोग्यासेवेसाठी त्यांना आजही बाहेरगावी जावे लागते, असे प्रश्न त्यांनी कॉर्नर सभेतून उपस्थित केले. 

No comments:

Powered by Blogger.