Latest News

Latest News
Loading...

(Breaking News) विजेचा धक्का लागून जनता रेस्टॉरंट मालकाचा मृत्यू

प्रशांत चंदनखेडे वणी 

वणी ग्रामीण रुग्णालयासमोर असलेल्या जनता रेस्टॉरंट मालकाला विजेचा जबर धक्का लागल्याने त्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची व्ह्रदयद्रावक घटना १ नोव्हेंबरला दुपारी ११.२५ वाजताच्या सुमारास घडली. शाहिद खान वाहिद खान (४३) असे या करंट लागून मृत्युमुखी पडलेल्या युवकाचे नाव आहे. 

शहरातील प्रसिद्ध जनता रेस्टॉरंटचे मालक असलेले शाहिद खान हे रेस्टॉरंट मधील कामगारांसह रेस्टॉरंटची साफसफाई करीत होते. त्यावेळी विद्युत पुरवठा खंडित झालेला होता. त्यांनी रेस्टॉरंट मधील इन्व्हर्टर बाजूला करून त्याचा प्लग काढला. इन्व्हर्टरशी जुळलेला वायर बाजूला करीत असतांनाच विद्युत पुरवठा सुरु झाला. त्यामुळे वायरमध्ये वीज प्रवाह संचारला. हातातच असलेल्या विद्युत वायरमध्ये संचारलेल्या विज प्रवाहाचा जोरदार करंट लागल्याने शाहिद खान यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. रेस्टॉरंट मधील कामगारांनी वीज प्रवाह बंद करण्याचा पुरेपूर प्रयत्न केला. मात्र तोपर्यंत बराच उशीर झाला होता. शाहिद खान यांना रुग्णालयात दाखल केल्यानंतर डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. दिवाळीच्या दिवशीच युवकाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त होत आहे. 

No comments:

Powered by Blogger.