प्रशांत चंदनखेडे वणी
महाविकास आघाडीचे शिवसेना (उबाठा) गटाचे उमेदवार संजय देरकर यांना विविध क्षेत्रातून पाठिंबा मिळू लागला आहे. सामाजिक क्षेत्रातूनही त्यांना पाठिंबा मिळतांना दिसत आहे. सामाजिक कार्यकर्त्यांकडून त्यांना पाठिंबा दर्शविला जात आहे. सामाजिक कार्यकर्ते उमेश पोद्दार यांनी संजय देरकर यांना विनाशर्त पाठिंबा दर्शविला असून त्यांनी शिवसेनेत (उबाठा) पक्ष प्रवेश देखील केला आहे. संजय देरकर यांच्या प्रचारार्थ शहरातून काढण्यात आलेल्या रॅलीत सहभाग घेऊन त्यांनी संजय देरकर यांना पाठिंबा दर्शविला आहे. उमेश पोद्दार यांचे सामाजिक क्षेत्रातील कार्य उल्लेखनीय असून त्यांचा सामाजिक कार्यात नेहमी सहभाग राहिला आहे. अनेक स्वयंसेवी संस्थांना ते मदत करतात. सामाजिक कार्यात ते नेहमी अग्रेसर असतात. संकटात त्यांनी अनेकांना मदत केली आहे. त्यांचं मित्र मंडळही मोठं आहे. त्यामुळे त्यांनी संजय देरकर यांना दिलेल्या पाठिंब्याने मतांची गोळाबेरीज वाढविण्यात नक्कीच मदत होईल असा सूर आता उमटू लागला आहे.
शहरातील एका प्रतिष्ठित व्यावसायिकाचे उमेश पोद्दार हे विश्वासू आहेत. त्यांचं व्यक्तिमत्वही प्रभावी आहे. उमेश पोद्दार यांचं सामाजिक कार्यही उल्लेखनीय आहे. अनेक गरजवंतांना त्यांनी सढळ हाताने मदत केली आहे. सामाजिक उपक्रमातही त्यांनी हिरीरीने सहभाग घेतला आहे. सामाजिक व स्वयंसेवी संस्थांना ते नेहमी मदत करतात. त्यांनी राजकीय पटलावर संजय देरकर यांना समर्थन दिले आहे. संजय देरकर यांना त्यांनी जाहीर पाठिंबा दर्शविला आहे. एवढेच नाही तर त्यांनी शिवसेना पक्षात प्रवेश देखील केला आहे. सामाजिक कार्यकर्ते उमेश पोद्दार यांच्या पाठिंब्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. उमेश पोद्दार यांनी संजय देरकर यांना दिलेला पाठिंबा मतांची गोळाबेरीज वाढविण्यात भक्कम ठरू शकतो. त्यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ माजली आहे.

No comments: