Latest News

Latest News
Loading...

शेतकरी पुत्राने घेतला विषाचा घोट, आत्महत्येचं सत्र सुरूच

प्रशांत चंदनखेडे वणी 

एका २२ वर्षीय शेतकरी पुत्राने राहत्या घरी विषारी द्रव्य प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना शुक्रवार दि.२२ नोव्हेंबरला दुपारी २ वाजताच्या सुमारास घडली. अमोल दयालाल काकडे (२१) रा, सिंधी वाढोणा ता. झरी असे या विषाचा घोट घेतलेल्या तरुणाचे नाव आहे. 

मुकुटबन पोलिस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या सिंधी वाढोणा येथे कुटुंबासोबत राहत असलेल्या तरुणाने घरी कुणी नसल्याची संधी साधून विषारी द्रव्य प्राशन केले. ही बाब घराशेजारी राहणाऱ्या तरुणांच्या लक्षात येताच त्यांनी घराचा दरवाजा तोडून त्याला बाहेर काढले. नंतर त्याच्या कुटुंबियांना ही माहिती देण्यात आली. कुटुंबीयांनी शेजाऱ्यांच्या मदतीने तात्काळ त्याला शहरातील एका मल्टीस्पेशालिटी दवाखान्यात दाखल केले. मात्र तेथील डॉक्टरांनी त्याला तपासून मृत घोषित केले. मृतक अमोल हा कुटुंबियांसोबत शेतात फवारणीसाठी गेला होता. नंतर दुपारी तो एकटाच घरी परतला. घराच्या खोलीत जाऊन त्याने अचानक विषारी द्रव्य प्राशन केले. अमोल हा कुटुंबियांना शेतीच्या कामात हातभार लावतानाच महाविद्यालयीन शिक्षणही घेत होता. या तरुणाने असा हा टोकाचा निर्णय का घेतला हे अद्याप कळू शकले नाही. मात्र कुटुंबाचा आधार असलेल्या तरुणाने आत्मघाती निर्णय घेतल्याने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. तरुण मुलाच्या आत्महत्या करण्याने आई वडिलांना दुःख अनावर झालं आहे. मृतक अमोल याच्या पश्च्यात आई, वडील व मोठा भाऊ असा आप्त परिवार आहे. 

No comments:

Powered by Blogger.