स्ट्रॉंगरूम जवळ ईव्हीएम हॅक करणारे साहित्य आढळल्याच्या अफवेने उडाली एकच खळबळ

प्रशांत चंदनखेडे वणी 

ईव्हीएम मशीन ठेऊन असलेल्या शासकीय गोदामाजवळ एक मालवाहू पिकअप वाहन संशयास्पदरित्या उभं दिसल्याने शिवसैनिकांनी सतर्कता दाखवून ते वाहन पोलिसांच्या ताब्यात दिले. त्या वाहनात इलेक्ट्रॉनिक व इंटरनेटशी संबंधित साहित्य आढळून आल्याने ते साहित्य ईव्हीएम मशीन हॅक करणारं असू शकतं, असा संशय आल्याने शिवसैनिकांनी त्या वाहनाला घेराव घालून या वाहनाबाबत पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी सदर वाहन ताब्यात घेऊन पोलिस स्टेशनला लावले. यावेळी महाविकास आघाडीचे उमेदवार संजय देरकर यांनी आक्रमक भूमिका घेत हा नेमका काय प्रकार आहे, याची शहानिशा होईपर्यंत पोलिस स्टेशनला ठिय्या मांडला. नंतर ही वार्ता वाऱ्यासारखी शहरात पसरली. 

ईव्हीएम हॅक करणारे वाहन पकडल्याच्या चर्चेने शहरात एकच गोंधळ उडाला. राजकीय पक्षांच्या नेत्यांसह सर्व प्रमुख पदाधिकारी पोलिस स्टेशनला धडकले. नागरिकांनीही पोलिस स्टेशन बाहेर प्रचंड गर्दी केली होती. शेकडो नागरिक पोलिस स्टेशन परिसरात जमले होते. रात्री १०.३० वाजेपर्यंत नागरिकांचा जमाव पोलिस स्टेशन व पोलिस स्टेशन परिसरात जमला होता. गर्दीवर नियंत्रण मिळविण्यात पोलिसांना चांगलीच दमछाक करावी. त्यानंतर एसडीपीओ गणेश किंद्रे व ठाणेदार अनिल बेहेरानी यांनी शीघ्र या प्रकरणाची शहनिशा केली. हे वाहन मोबाईल नेटवर्क कंपनीचे असल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले व सर्वांनी सुटकेचा निश्वास सोडला. मात्र शहरात ईव्हीएम हॅक  करणारे साहित्य आढळल्याच्या अफवेने कडाक्याच्या थंडीतही शहरातील वातावरण चांगलंच तापलं होतं. 

स्ट्रॉंगरूम जवळ शिवसैनिकांना एक मालवाहू पिकअप वाहन बऱ्याच वेळ पर्यंत संशयास्पद स्थितीत उभे दिसले. शिवसैनिकांनी त्या वाहनाची तपासणी केली असता त्यांना त्यात इलेक्ट्रॉनिक व इंटरनेटशी संबंधित काही साहित्य आढळून आले. त्यामुळे मत मोजणी पूर्वी ईव्हीएम मशीनमध्ये काही तरी गडबड करण्याचा हा प्रकार असू शकतो, असा शिवसैनिकांना संशय आला. त्यांनी याबाबत तात्काळ आपल्या उमेदवाराला माहिती दिली. शिवसेना (उबाठा) गटाचे उमेदवार संजय देरकर हे वाहन उभे असलेल्या ठिकाणी दाखल झाले. नंतर पोलिसांना त्या ठिकाणी पाचारण करण्यात आले. या वाहनाला पोलिसांच्या ताब्यात देऊन संजय देरकर यांचा ताफा पोलिस स्टेशनला आला. संजय देरकर यांनी आक्रमक भूमिका घेत या प्रकारची शहानिशा होईपर्यंत पोलिस स्टेशनलाच ठिय्या मांडला. पाहता पाहता शेकडोंचा जमाव पोलिस स्टेशन येथे जमा झाला. मात्र काही वेळातच पोलिसांनी या प्रकरणाची शहनिशा करून हे वाहन एका मोबाईल नेटवर्क कंपनीचे असल्याचा खुलासा केला. घुग्गुस येथे या मोबाईल नेटवर्क कंपनीचे टॉवर उभारण्यात येत असल्याने हे साहित्य तेथे पोहचविले जात असल्याचे पोलिस तपासात पुढे आल्याने सर्वांनीच सुटकेचा निश्वास टाकला. आणि जमावाने पोलिस स्टेशन मधून काढता पाय घेतला. मात्र या अफवेने शहरात एकच खळबळ उडाली होती. 

Comments

Popular posts from this blog

(Breaking News) वणी वरोरा महामार्गावर भीषण अपघात, दुचाकीस्वार तरुण जागीच ठार

नंदीग्राम एक्सप्रेसने कटून तरुणीचा मृत्यू, तरुणीने आत्महत्या केल्याचा संशय

वाहन चालकाचे नियंत्रण सुटले आणि झाला अपघात, एक महिला ठार तर आठ जण जखमी