अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार जागीच ठार
प्रशांत चंदनखेडे वणी
वणी मुकुटबन मार्गावर अज्ञात वाहनाने दुचाकीला मागून जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघातात दुचाकीस्वार जागीच ठार झाला. ही घटना वणी मुकुटबन मार्गावरील उमरी ते नवरगाव दरम्यान २१ नोव्हेंबरला दुपारी ४.३० वाजताच्या सुमारास घडली. राजकुमार मनोहर दडांजे (१९) रा. उमरघाट ता. मारेगाव असे या अपघातात ठार झालेल्या तरुणाचे नाव आहे.
वणी येथे आयटीआय चे शिक्षण घेतांनाच हा तरुण पोलिस भारतीचीही तयारी करत होता. शासकीय मैदानावर सराव करण्याकरिता मुकुटबन वरून वणीला येत असतांना उमरी वळणावर मागून भरधाव येणाऱ्या वाहनाने त्याच्या दुचाकीला (MH २९ AP ७७४१) जोरदार धडक दिली. अज्ञात वाहनाच्या धडकेत शिक्षण घेणारा हा विद्यार्थी जागीच ठार झाला. दुचाकीला धडक दिल्यानंतर वाहन चालक हा वाहनासह पसार झाला. अज्ञात वाहनाची धडक बसताच तरुण हा दुचाकीसह रोडच्या कडेला पडला. त्याच्या डोक्याला गंभीर मार लागल्याने त्याचा घटनास्थळावरच मृत्यू झाला. अपघाताची माहिती पोलिसांना मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळ गाठले. घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणी करीता ग्रामीण रुग्णालयात पाठविला. पोलिसांनी अज्ञात वाहन चालकाविरुद्ध गुन्हा नोंद केला आहे. तसेच अज्ञात वाहनाचा पोलिसांकडून शोधही घेतला जात आहे. घटनेचा पुढील तपास पोलिस करीत आहे.
Comments
Post a Comment