Latest News

Latest News
Loading...

गुरुवारी वसंत जिनिंग लॉन येथे संजय देरकर यांची भव्य प्रचार सभा, विविध क्षेत्रातील मान्यवरांची लाभणार उपस्थिती

प्रशांत चंदनखेडे वणी 

महाविकास आघाडीचे शिवसेना (उबाठा) गटाचे उमेदवार संजय देरकर यांच्या प्रचारार्थ गुरवार दि. १४ नोव्हेंबरला सायंकाळी ६.३० वाजता स्थानिक वसंत जिनिंग लॉन येथे भव्य सभा आयोजित करण्यात आली आहे. या सभेचे अध्यक्ष माजी आमदार वामनराव कासावार हे राहतील. तसेच या सभेला महाविकास आघाडीचे सर्व नेते प्रामुख्याने उपस्थित राहणार आहेत. संजय देरकर यांचा झंझावाती प्रचार सुरु असून वणी विधानसभा क्षेत्रात त्यांच्या प्रचाराचा धुराळा उडाला आहे. सर्व शिवसैनिक, महाविकास आघाडीचे कार्यकर्ते व समर्थक संजय देरकर यांच्या प्रचाराची कमान सांभाळून आहेत. त्यांच्या प्रचारासाठी आता प्रख्यात वक्ते व जेष्ठ संपादक बाळासाहेब कुलकर्णी हे वणीला येत आहेत. 

संजय देरकर यांच्या प्रचाराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. त्यांच्या प्रचार सभांनाही जनतेची प्रचंड उपस्थिती लाभत आहे. १४ नोव्हेंबरला वसंत जिनिंग लॉन येथे संजय देरकर यांच्या प्रचारार्थ भव्य सभा आयोजित करण्यात आली आहे. या सभेला प्रसिद्ध वक्ते व जेष्ठ संपादक बाळासाहेब कुलकर्णी यांची उपस्थिती लाभणार आहे. तसेच शिक्षक आमदार सुधाकर अडबाले, आ. अभिजित वंजारी, विमाशी संघाचे प्रांतीय अध्यक्ष अरविंद देशमुख, माजी गटशिक्षण अधिकारी उत्तमराव गेडाम आदी मान्यवर देखील उपस्थित राहणार आहेत. ते महाविकास आघाडीचा अजेंडा व महाविकास आघाडीच्या उमेदवारांना विजयी करण्याबाबत भूमिका मांडणार आहेत. तरी या सभेला नागरिकांनी जास्तीतजास्त संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन शिवसेना (उबाठा) व महाविकास आघाडीच्या वतीने करण्यात आले आहे.  

No comments:

Powered by Blogger.