वणी विधानसभा मतदार संघाच्या झालेल्या निवडणुकीची मतमोजणी सुरु, आठ फेऱ्या पूर्ण, संजय देरकर ५४४७ मतांनी आघाडीवर

प्रशांत चंदनखेडे वणी 

वणी विधानसभा मतदार संघाच्या २० नोव्हेंबरला झालेल्या निवडणुकीचे आज निकाल जाहीर होणार आहेत. शहरातील शासकीय गोदाम येथे पोलिसांच्या कडेकोट बंदोबस्तात मत मोजणी सुरु असून मत मोजणीच्या पहिल्याच फेरी पासून महाविकास आघाडीचे संजय देरकर यांनी आघाडी घेतली आहे. मत मोजणीची सातवी फेरी पूर्ण झाली आहे. त्यात संजय देरकर यांनी ५४४७ मतांची आघाडी घेतली आहे. संजय देरकर यांच्या मतांची आघाडी सतत वाढत आहे. 

संजय देरकर २७८०३, संजीवरेड्डी बोदकुरवार २२३५६ तर राजू उंबरकर यांना आता पर्यंत ९६३९  मते मिळाली आहेत. पुढील मत मोजणी सुरु आहे. 

मत मोजणीची पुढील आकडेवारी पाहण्याकरिता याच लिंकवर क्लिक करावे. 

Comments

Popular posts from this blog

(Breaking News) वणी वरोरा महामार्गावर भीषण अपघात, दुचाकीस्वार तरुण जागीच ठार

नंदीग्राम एक्सप्रेसने कटून तरुणीचा मृत्यू, तरुणीने आत्महत्या केल्याचा संशय

वाहन चालकाचे नियंत्रण सुटले आणि झाला अपघात, एक महिला ठार तर आठ जण जखमी