प्रशांत चंदनखेडे वणी
छत्रपती संभाजी महाराज इकॉनॉमिक फोरम व मराठा सेवा संघाच्या संयुक्त विद्यमाने सावित्री-जिजाऊ दशरात्रौउत्सवाचे औचित्य साधून शहरातील धनोजे कुणबी समाज सांस्कृतिक सभागृह येथे ११ जानेवारीला भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या व समाज उपयोगी उपक्रम राबवून सामाजिक चळवळीचा वारसा पुढे नेणाऱ्या या संघटनांनी मानवी जीवांना रक्ताची भासणारी गरज ओळखून हे रक्तदान शिबीर आयोजित केलं आहे. नागपूर येथील लाईफ लाईन ब्लड बँकेच्या माध्यमातून या शिबिरात रक्त संकलन करण्यात येणार आहे. आपण दान केलेल्या रक्तामुळे कुणाला तरी जीवनदान मिळेल, ही सामाजिक जाण ठेवणाऱ्यांनी या शिबिरात सहभागी होऊन मोठ्या संख्येने रक्तदान करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
मराठा आरोग्य कक्ष प्रमुख अरुण डवरे यांच्या नेतृत्वात व मराठा सेवा संघ वणीचे अध्यक्ष अंबादास वागदरकर, सचिव नितीन मोवाडे, विधी सल्लागार ऍड. अमोल टोंगे, छत्रपती संभाजी महाराज इकॉनॉमिक फोरमचे उपाध्यक्ष अशोक पिंपळशेंडे, सचिव मंगेश खामनकर, विद्यमान संचालक भास्कर दुमोरे, मारोती मोडक, विवेक गाडगे, मारोती जिवतोडे, विनोद बोबडे, दत्ता पुलेनवार, संजय जेऊरकर, प्रदीप बोरकुटे, दिलीप वागदरकर, अजय धोबे यांच्या सहकार्यातून हे शिबिर घेण्यात येत आहे. सकाळी ११ वाजता राष्ट्रमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून या शिबिराला सुरुवात होणार आहे. लाईफ लाईन ब्लड बँकेचे चमू रक्त संकलनाची जबाबदारी पार पाडणार आहेत. रक्तदात्यांनी मोठ्या संख्येने या शिबिरात येऊन रक्तदान करण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे. शिबिराच्या यशस्वीतेकरिता छत्रपती संभाजी महाराज इकॉनॉमिक फोरम व मराठा सेवा संघाचे कार्यकर्ते परिश्रम घेत आहे.
No comments: