देव दर्शनावरून परतणाऱ्या तरुणांच्या दुचाकीला अपघात, एक ठार तर एक गंभीर जखमी


प्रशांत चंदनखेडे वणी 

मोटारसायकल चालकाचे मोटारसायकल वरील नियंत्रण सुटल्याने झालेल्या अपघातात एक जण ठार झाला. तर दुसरा गंभीर जखमी झाल्याची घटना २६ फेब्रुवारीला रात्री ९.३० वाजताच्या सुमारास वणी तालुक्यातील राजूर (कॉ) गावाजवळ घडली. तनय परशुराम पिंपळकर (२२) रा. वणी असे या अपघातात ठार झालेल्या तरुणाचे नाव आहे. तर त्याचा मित्र सुमित पांडुरंग मेश्राम (२४) रा. राजूर (कॉ.) हा या अपघातात गंभीर जखमी झाला आहे. 

महाशिवरात्री निमित्त शिरपूर येथे मोठी जत्रा भरते. येथे शंकरजीच्या दर्शनाकरिता दूरवरून भाविक येतात. हे दोन्ही मित्र शिरपूर येथे शंकरजीच्या दर्शनाकरिता गेले होते. दर्शन करून परत येतांना त्यांच्या दुचाकीला अपघात झाला. यात एक मित्र मृत्युमुखी पडला. तर दुसरा गंभीर जखमी झाला. सुमित मेश्राम याच्या दुचाकीने (MH २९ CD १८९८) हे दोन्ही मित्र शिरपूर येथे गेले होते. दुचाकीवर मागे बसून असलेला तनय पिंपळकर हा या अपघातात मरण पावला. शिरपूर वरून रात्री ९.३० वाजता वणी मार्गे राजूर (कॉ.) येथे जात असतांना राजूर फाट्यापासून काही अंतरावर असलेल्या न्यू राजूर सिटी वळण रस्त्यावर दुचाकी चालक सुमित मेश्राम याचे दुचाकीवरील नियंत्रण सुटले, व दुचाकीसह हे दोन्ही मित्र रोडवर पडले. यात तनय पिंपळकर याच्या डोक्याला जबर मार लागला. घटनास्थळी उपस्थित असलेल्या नागरिकांनी दोघांनाही तात्काळ ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी तन्मय पिंपळकर याला तपासून मृत घोषित केले. अपघाताची माहिती पोलिसांना मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून घटनास्थळाचा पंचनामा केला. दुचाकी चालकाने सुसाट व निष्काळजीपणे दुचाकी चालविल्याने हा अपघात घडल्याचे पोलिस तपासातून समोर आले. याबाबत मृतक तनयचा चुलत भाऊ अक्षय एकनाथ पिंपळकर (३२) रा. संत रविदास नगर वणी याच्या तक्रारी वरून पोलिसांनी दुचाकी चालकाविरुद्ध बीएनएसच्या कलम २८१, १२५ (A), १०६(१) नुसार गुन्हा दाखल केला आहे. घटनेचा पुढील तपास एपीआय धीरज गुल्हाने करीत आहे.  

Comments

Popular posts from this blog

(Breaking News) वणी वरोरा महामार्गावर भीषण अपघात, दुचाकीस्वार तरुण जागीच ठार

नंदीग्राम एक्सप्रेसने कटून तरुणीचा मृत्यू, तरुणीने आत्महत्या केल्याचा संशय

वाहन चालकाचे नियंत्रण सुटले आणि झाला अपघात, एक महिला ठार तर आठ जण जखमी