प्रशांत चंदनखेडे वणी
वणी एमआयडीसी (MIDC) परिसरातील क्वाटर जवळील झाडाला गळफास लावून एका युवकाने आत्महत्या केल्याची घटना सोमवार दि. १६ जूनला दुपारी ३.३० ते ४ वाजताच्या सुमारास उघडकीस आली. वामन दिगांबर बुरचुंडे वय अंदाजे ४२ वर्षे रा. लालगुडा (जुना) ता. वणी असे या गळफास घेतलेल्या युवकाचे नाव आहे.
वामन बुरचूंडे हा आपल्या कुटुंबासह लालगुडा (जुना) येथे राहायचा. गवंडी काम करणारा हा युवक छोटे मोठे बांधकामाचे ठेके देखील घ्यायचा. यातून मिळणाऱ्या मिळकतीतून तो आपला प्रपंच चालवायचा. अतिशय मेहनती असलेल्या या युवकाने नैराश्येतून आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलले. एमआयडीसी परिसरातील क्वाटर जवळ असलेल्या खुल्या मैदानातील झाडाला गळफास लावून त्याने आपली जीवनयात्रा संपविली. त्याच्या आत्महत्या करण्याने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. कुटुंबातील कर्त्या पुरुषाने असा हा आत्मघाती निर्णय घेतल्याने कुटुंबं दुःखं सागरात बुडालं आहे. वामन बुरचुंडे याच्या पश्च्यात पत्नी व एक मुलगा असा आप्त परिवार आहे. घटनेची माहिती पोलिसांना मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळ गाठून घटनास्थळाचा पंचनामा करीत मृतदेह उत्तरीय तपासणी करीता ग्रामीण रुग्णालयात पाठविला. वामन बुरचूंडे याच्या आत्महत्येचे नेमके कारण अद्याप कळू शकले नाही. पुढील तपास पोलिस करीत आहे.
No comments: