वणी तालुक्यातील कोलेरा गावात साचले पावसाचे पाणी, वेकोलिच्या नियोजनशून्यतेचा गावकऱ्यांना बसला फटका

प्रशांत चंदनखेडे वणी तालुक्यातील कोलेरा (पिंपरी) या गावात पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. मागील तिने ते चार दिवसांपासून तालुक्यात पावसाचा जोर कायम आहे. कधी संततधार तर कधी मुसळधार पाऊस पडत असल्याने कोलेरा या गावात मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. वेकोलिच्या ढिसाळ नियोजनामुळे गावाला पावसाच्या पाण्याने वेढा घातला असून नागरिकांच्या घरातही पाणी शिरले आहे. गावातील काही घरांना तर पावसाच्या पाण्याचा मोठ्या प्रमाणात फटका बसला आहे. घरांमध्ये प्रचंड पाणी शिरल्याने काही कुटुंबं उघड्यावर आली आहेत. त्यांना मिळेल तेथे आसरा घ्यावा लागत आहे. वेकोलिने डंप केलेल्या मातीच्या ढिगाऱ्यांमुळे कोलेरा या गावात ही परिस्थिती उद्भवली आहे. भूस्खलनामुळे गावातील पाणी वाहवून नेणारा नाला अरुंद झाला असून नाल्यातील पाण्याचा प्रवाह पूर्णपणे खुंटला आहे. त्यामुळे कोलेरा गाववासीयांवर पूर परिस्थितीचा सामना करण्याची वेळ आली आहे. तालुक्यात पावसाने थैमान घातले आहे. मागील तीन ते चार दिवसांपासून सारखा पाऊस सुरु आहे. कधी तीव्र तर कधी माध्यम स्वरूपाचा पाऊस पडत आहे. संततधार व मुसळधार पडणाऱ्या या पावसामुळे कोलेरा या गावात मोठ्या ...