प्रशांत चंदनखेडे वणी :-
पचमढी (मध्य प्रदेश) येथे देवदर्शनासाठी गेलेल्या व्यावसायिकाचा व्ह्रदय विकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. ही घटना २२ जुलैला पहाटे उघडकीस आली. विनोद गोविंदराव मृत्यलवार (५३) असे या दुर्दैवी मृत्यू ओढवलेल्या व्यावसायिकाचे नाव आहे.
शहरातील कणकवाडी येथे वास्तव्यास असलेल्या विनोद मृत्यलवार यांचे टिळक चौकातील शिवतीर्थ कॉम्प्लेक्स येथे सायकल व मोटारसायकल दुरुस्तीचे दुकान आहे. ते आपल्या मुलासह पचमढी येथे देवदर्शनासाठी गेले होते. दरम्यान २२ जुलैला पहाटेच्या सुमारास त्यांना व्ह्रदय विकाराचा तीव्र झटका आला. आणि त्यातच त्यांचे निधन झाले. युवा व्यावसायिकाचा असा हा अचानक व अकाली मृत्यू झाल्याने शहरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
मध्य प्रदेशातील पचमढी हे पर्यटनासाठी प्रसिद्ध आहे. तसेच देवदर्शनासाठीही हजारो भाविक पचमढीला जातात. विनोद मृत्यलावर हे देखील आपल्या मुलासोबत पर्यटन व देवदर्शन या दुहेरी हेतूने पचमढीला गेले होते. मात्र नियतीला काही वेगळेच मान्य होते. प्रसन्न चित्ताने पचमढी येथे गेलेल्या विनोद मृत्यलवार यांच्यावर नियतीने डाव साधला आणि त्यांना कायमचे हिरावून घेतले. त्यांच्या आकस्मात मृत्यूने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्यांच्या पश्च्यात पत्नी, एक मुलगा आणि बराच मोठा आप्त परिवार आहे. सर्वांशी सलोखा व स्नेहबंध जपणारा व्यक्ती अचानक काळाच्या पडद्याआड गेल्याने परिसरात शोककळा पसरली आहे.
No comments: