Latest News

Latest News
Loading...

वाघदरा फाटा येथे अनधिकृत कीटकनाशक विक्री प्रकरणी दोघांना अटक

प्रशांत चंदनखेडे वणी 

कृषी अधिकारी (गुण नियंत्रण) दीपक चंद्रप्रकाश वानखेडे यांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार वाघदरा फाटा येथे अनधिकृतपणे फवारणीचे औषध विक्री करणाऱ्या दोघा इसमांना रंगेहाथ पकडण्यात स्थानिक गुन्हे शाखा (L.C.B.) व कृषी विभागाच्या पथकाला यश आले.

मिळालेल्या माहितीनुसार, एलसीबी पथक व कृषी विभागाचे अधिकारी रविंद्र भोजने, देवेंद्र पाचभाई व विश्वास फुलमाळी यांनी संयुक्तपणे वाघदरा फाटा येथे सापळा रचला. सायंकाळी 7 वाजता MH-29 R-3029 क्रमांकाची मारुती सुझुकी कार संशयास्पद स्थितीत आढळली.

त्यामध्ये दोन इसम बसून असल्याचे कार्यवाही पथकाला आढळून आले. त्यांना त्यांची नावे विचारली असता त्यांनी योगेश गुणवंतराव देशमुख (44) व सचिन शंकर उरकुडे (40) रा. बेला, जि. आदिलाबाद (तेलंगणा) अशी सांगितली. पथकाने कारची झडती घेतली असता त्यात त्यांना बोगस कीटकनाशक औषधांचा साठा आढळून आला. 

पथकाने त्‍यांच्या ताब्यातून 80 बॉक्स व 10 बॉटल अनधिकृत फवारणीचे औषध, किंमत ₹2,14,190 व मारुती सुझुकी कार किंमत ₹3,00,000 असा एकूण 5,14,190 चा मुद्देमाल जप्त केला.

सदर फवारणीचे औषध महाराष्ट्रात प्रतिबंधित असून, आरोपी महाराष्ट्र शासन, कृषी विभाग आणि शेतकऱ्यांची फसवणूक करीत असल्याचे उघड झाले आहे.

या प्रकरणी वणी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपींवर भारतीय न्याय संहिता, 2023 चे कलम 318(4) व कलम 3(5) अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक गोपाल उंबरकर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.


No comments:

Powered by Blogger.