प्रशांत चंदनखेडे वणी :-
मारेगाव तालुक्यातील गौराळा येथे रस्त्याच्या किरकोळ वादातून शेतकऱ्याला मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिल्याची घटना रविवारी (दि. 24 ऑगस्ट) सकाळी उघडकीस आली. या प्रकरणी दोन जणांविरुद्ध मारेगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी जंगलु शंकर कुचनकार (वय 55, रा. गौराळा) हे सकाळी साडेसहा वाजताच्या सुमारास घरालगत असलेल्या बैलांच्या गोठ्याजवळ झाडझुड करीत असताना गावातील नरेश आत्राम (वय 40) याने “तुमची बैलबंडी रस्त्याच्या मधोमध उभी राहते, त्यामुळे आम्हाला जाणे येणे करण्यास अडचण होते, ती बाजूला ठेवा” असा दम देत त्यांच्याशी वाद घालून काठीने त्यांच्या डाव्या हातावर प्रहार केला.
यावेळी त्याच्यासोबत असलेल्या मंगेश पुनम टेकाम (वय 30) याने फिर्यादी व त्यांच्या पत्नीला शिवीगाळ करून “पुन्हा बैलबंडी या रस्त्याने आणली तर जिवे मारून टाकू” अशी धमकी दिली.
या घटनेनंतर जंगलु कुचनकार यांनी मारेगाव पोलिस स्टेशनला धाव घेत तक्रार दाखल केली. पोलिसांनी दोन्ही आरोपींविरुद्ध मारहाण व जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी बीएनएसच्या कलम ११८(२), ३(५), ३५१(२), ३५१(३), ३५२ नुसार गुन्हा नोंदविला असून पुढील तपास पोलिस करीत आहे.
No comments: