प्रशांत चंदनखेडे वणी
शहरातील प्रसिद्ध मोंटू का ढाब्याचे संचालक मोंटू उर्फ दिलीप वाधवानी यांचे दीर्घ आजाराने निधन झाले. मृत्यू समयी त्यांचं वय ५६ वर्षांचं होतं. ते मागील काही दिवसांपासून फुफ्फुसाच्या आजाराने ग्रस्त होते. त्यांच्यावर हैद्राबाद येथील रुग्णालयात उपचार सुरु होता. मात्र त्यांचा उपचाराला प्रतिसाद न मिळाल्याने उपचारादरम्यान ९ ऑगस्टला रात्री ८ वाजता त्यांनी शेवटचा श्वास घेतला. मोंटू वाधवानी हे सर्वपरिचित व साहतमुख असं व्यक्तिमत्व होतं. मितभाषी स्वभाव असलेल्या मोंटू यांचे सर्वांशी सलोख्याचे संबंध होते.
सिंधी कॉलनी येथील "मोंटू का ढाबा" हे तरुणांपासून तर वयस्कांपर्यंत सर्वांनाच परिचित असलेलं नाव. शहरातच नाही तर गाव खेड्यातही मोंटू का ढाबा सर्वांनाच माहिती आहे. याच ढाब्यावरून त्यांना एक वेगळी ओळख मिळाली होती. राजकीय व सामाजिक क्षेत्रातील मंडळी त्यांच्या ढाब्यावर तासंतास बसायची. येथे विविध विषयांवर चर्चा रंगायच्या. एवढेच नाही तर सर्वसामान्यांची प्रथम पसंदही मोटू का ढाबा हीच असायची. पैसे कधी कमी पडले किंवा एखाद्याजवळ कधी पैसे नसले तरीही मोंटू त्यांना ढाब्यावरून कधी वापस पाठवायचे नाही, हा त्यांचा स्वभावगुण होता. मात्र त्यांना अचानक जडलेल्या गंभीर आजाराने त्यांचं आकस्मिक निधन झालं. आज १० ऑगस्टला दुपारी २ वाजता त्यांच्या राहत्या घरून त्यांची अंतयात्रा निघणार आहे. मोंटू वाधवानी यांना लोकसंदेश न्यूज परिवाराकडून भावपूर्ण श्रद्धांजली.
No comments: