प्रशांत चंदनखेडे वणी :-
शहरातील आदर्श कॉलनी परिसरातील खुल्या मैदानात सुरु असलेल्या जुगारावर पोलिसांनी धाड टाकून गंजीपत्त्यावर पैशाच्या हरजितीचा जुगार खेळणाऱ्या चार जुगाऱ्यांना रंगेहात अटक केली. ही कार्यवाही २३ सप्टेंबरला दुपारी २.२० वाजताच्या सुमारास करण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळावरून ४०५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
नवरात्रौत्सवानिमित्त शहरात गस्त घालणाऱ्या पोलिसांना आदर्श कॉलनी येथे जिनिंगच्या खुल्या मैदानावर मोठा जुगार भरला असल्याची माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी आदर्श कॉलनी येथे जाऊन पाहणी केली असता तेथे खुल्या मैदानावर काही इसम गंजीपत्त्यावर पैशाचा जुगार खेळतांना दिसले. पोलिसांनी मोठ्या शिताफीने त्याठिकाणी धाड टाकली. पोलिसांची चाहूल लागताच काही इसम पळत सुटले. तर चार जुगारी पोलिसांच्या हाती लागले. गंजीपत्त्यावर पैशाच्या हारजितीचा जुगार खेळतांना रंगेहात सापडलेल्या चारही आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले. तसेच त्यांच्या अंगझडतीत पोलिसांना रोख ४०५० रुपये मिळून आले. पोलिसांनी घटनास्थळावरून गंजीपत्ते व ४०५० रुपये रोख असा मुद्देमाल जप्त केला आहे.
पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या आरोपींमध्ये योगेश बाबाराव पारखी (३३) रा. वाघापूर टेकडी यवतमाळ, ह.मु . दामले फैल, क्रांतेश रमेश तावाडे (३१) रा. दामले फैल, अशोक सटेवाजी अंकुश (३५) रा. बहुपेठ, भिवापूर (चंद्रपूर), रोहित किशोर रापूसीया (२५) रा. तलाव फैल वणी यांचा समावेश असून या चारही आरोपींवर पोलिसांनी मजुकाच्या कलम १२(अ) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलिस करीत आहे.
No comments: