Latest News

Latest News
Loading...

दारूच्या नशेत सासूला मारहाण – मारेगावात जावयाविरुद्ध गुन्हा दाखल

प्रशांत चंदनखेडे वणी :-

मारेगाव तालुक्यातील कान्हाळगाव येथील एका 59 वर्षीय वृद्ध महिलेला तिच्याच जावयाने दारूच्या नशेत मारहाण केल्याची संतापजनक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी पीडित महिलेच्या तक्रारीवरून मारेगाव पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी रेखा अशोक पंधरे (वय 59, रा. कान्हाळगाव, ता. मारेगाव, जि. यवतमाळ) या मागील महिनाभरापासून आपली मुलगी व जावई यांच्या सोबत मारेगाव येथील वार्ड क्र. 13 मध्ये राहत होत्या. तब्येत बिघडल्यामुळे मुलगी आणि जावई यांनी त्यांना येथे आणले होते.

दि. 22 सप्टेंबर रोजी रात्री 10 वाजताच्या सुमारास जावई हेमंत नरहरी नरांजे (वय 44) हा दारूच्या नशेत घरी आला. त्यावेळी त्याने पत्नीला विनाकारण शिवीगाळ केली आणि थापडाने मारहाण केली. हा प्रकार पाहून फिर्यादी महिलेने मुलीचे समर्थन करत "ती आत्ता दुकानावरून आली आहे, का त्रास देत आहेस" असा जाब विचारला. याचा राग आल्याने आरोपीने सासूवरही हात उगारला.

आरोपी नरांजे याने सासूला अश्लील शिवीगाळ करून केसांना धरून बेडवरून फरशीवर पाडले. त्यानंतर हाताबुक्यांनी चेहऱ्यावर व कमरेवर मारहाण केली. या मारहाणीमुळे त्या जखमी झाल्या. घटनेनंतर पीडित महिला व तिची मुलगी थेट मारेगाव पोलीस ठाण्यात पोहोचल्या व त्यांनी तक्रार दाखल केली.

त्यांच्या तक्रारीनुसार व वैद्यकीय तपासणीनंतर आरोपी हेमंत नरहरी नरांजे याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहितेतील कलम ११८(१), ३५२ नुसार गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या घटनेमुळे परिसरात संताप व्यक्त होत असून, "दारूच्या नशेत कुटुंबीयांवर होणाऱ्या हिंसाचाराची ही धक्कादायक उदाहरणे समाजातील गंभीर वास्तव अधोरेखित करतात," अशी चर्चा स्थानिकांमध्ये रंगली आहे. घटनेचा पुढील तपास मारेगाव पोलिस करीत आहे.


No comments:

Powered by Blogger.