Latest News

Latest News
Loading...

विकासाची वाट उजळणारा दीपस्तंभ : माजी आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार ! "वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन"

प्रशांत चंदनखेडे वणी 

वणी विधानसभा मतदार संघाचे माजी आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांना वाढीदिवसानिमित्त उदंड आयुष्याच्या अनंत शुभेच्छा !🥀🎕🥀

शुभेच्छुक :- ऍड. निलेश महादेवराव चौधरी (वणी शहर अध्यक्ष भारतीय जनता पार्टी तथा प्रख्यात विधितज्ञ ) 

एका शहराचा चेहरा बदलायचा असेल तर केवळ दगड–विटा, रस्ते–पूल किंवा निधी पुरेसा ठरत नाही; त्यासाठी लागते दूरदृष्टी, त्याग आणि लोकांविषयीची खरी आस्था. वणी विधानसभा मतदारसंघाला ही देणगी लाभली ती माजी आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांच्या रूपाने.

२०१४ मध्ये पहिल्यांदा मतदारांचा कौल मिळाल्यानंतर त्यांनी वणीच्या विकासकथेचा एक नवा अध्याय सुरू केला. २०१९ मध्ये पुन्हा एकदा मतदारांनी दिलेल्या विश्वासाने त्या प्रवासाला आणखी बळ दिलं. हे विजय केवळ राजकीय नव्हते, तर लोकांच्या हृदयात त्यांनी जिंकलेल्या स्थानाचं द्योतक होते.

त्यांच्या कार्यकाळात वणी शहराने विकासाचा सुवर्णकाळ अनुभवला. कालपर्यंत धुळीत लोळणाऱ्या गल्ल्या काँक्रीटच्या रस्त्यांनी सजल्या. पाण्याच्या टंचाईने हैराण झालेल्या नागरिकांना वर्धा नदीवरून आलेल्या पाईपलाईनने दिलासा दिला. बगीचे, उद्याने, पार्क्सनी शहराला नवा श्वास दिला. दोन उड्डाणपूल, वणी–वरोरा महामार्ग, न्यायालयाची भव्य इमारत आणि क्रीडा संकुल—या प्रत्येक कामाने वणीचा चेहरामोहरा नव्याने घडवला.

पण त्यांची दृष्टी शहरापुरती मर्यादित नव्हती. ग्रामीण भागाचा विकास हा त्यांच्या अजेंड्याचा मुख्य भाग होता. तब्बल २०० कोटींचा निधी रस्त्यांसाठी आणून त्यांनी गावोगावी संवाद आणि दळणवळणाची दारे खुली केली. औद्योगिक क्षेत्र उभारण्याचे प्रयत्न करून रोजगाराच्या संधी वाढवल्या. तर युवकांना नवी उमेद देण्यासाठी क्रीडा भवनाची उभारणी केली.

त्यांच्या नेतृत्वाचं वैशिष्ट्य म्हणजे नागरिकांच्या प्रत्येक समस्येला त्यांनी स्वतःचं समजून घेतलं. लोकांच्या डोळ्यातील आशा त्यांनी वाचली आणि त्या आशा पूर्ण करण्यासाठी झटले. म्हणूनच वणी विधानसभा मतदारसंघ त्यांना आजही प्रेमाने ‘विकासपुरुष’ या नावाने गौरवतो.

आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त संपूर्ण मतदारसंघ त्यांच्या कार्याची उज्ज्वल परंपरा आठवतो, कृतज्ञतेने नतमस्तक होतो आणि त्यांच्या आयुष्याचा प्रवास अधिक समृद्ध व प्रेरणादायी व्हावा, अशी शुभेच्छा देतो.

No comments:

Powered by Blogger.