Latest News

Latest News
Loading...

"BREAKING NEWS" ब्राह्मणी फाट्याजवळील शिव मंदिरालगत आढळला अज्ञात इसमाचा कुजलेला मृतदेह


प्रशांत चंदनखेडे वणी :-

वणी घुग्गुस महामार्गावरील ब्राह्मणी फाट्याजवळ असलेल्या शिव मंदिरामागे एका अज्ञात इसमाचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. ही घटना सोमवार २९ सप्टेंबरला दुपारच्या सुमारास उघडकीस आली. मृत इसमाची अद्याप ओळख पटलेली नाही. 

ब्राह्मणी फाट्यापासून काही अंतरावर असलेल्या शिव मंदिरालगत एका अज्ञात इसमाचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला. या इसमाचा मृत्यू तीन ते चार दिवसांपूर्वी झाला असावा, असा अंदाज बांधण्यात येत आहे. ही माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणी करीता ग्रामीण रुग्णालयात पाठविला. 

मृतक इसमाची अद्याप ओळख पटली नसून पोलिस त्याची ओळख पटविण्याचा कसोशीने प्रयत्न करीत आहे. त्याने आत्महत्या केली, की हा घातपाताचा प्रकार आहे, की त्याच्या मृत्यूचे अन्य कुठले कारण आहे, असे अनेक प्रश्न यानिमित्ताने उपस्थित झाले असून मृतकाची ओळख पटल्यानंतर तपासाची पुढील दिशा निश्चित होणार आहे. तसेच शवविच्छेदन अहवालानंतर त्याच्या मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे. मृतकाची ओळख पटविण्याकरिता ठाणेदार गोपाल उंबरकर यांच्या मार्गदर्शनात जमादार राजू देठे हे शर्थीचे प्रयत्न करीत आहेत. 

No comments:

Powered by Blogger.