Latest News

Latest News
Loading...

विवाहित तरुणाने राहत्या घरी घेतला गळफास

प्रशांत चंदनखेडे वणी :-

तालुक्यातील येनक येथील विवाहित युवकाने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना बुधवार दि. १ ऑक्टोबरला सकाळी उघडकीस आली. पवन ऋषी कोडापे (३३) असे या गळफास घेतलेल्या युवकाचे नाव आहे. तो मानसिक आजाराने ग्रस्त असल्याचे समजते. 

पवन कोडापे हा येनक या गावात परिवारासह राहत होता. तो मागील काही दिवसांपासून मानसिक आजाराने ग्रस्त होता. त्याच्यावर चंद्रपूर येथे उपचार देखील सुरु होते. अशातच त्याने रात्री राहत्या घरी गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपविली. सकाळी त्याच्या भावाला तो घरच्या खोलीत गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. त्यांनतर ही माहिती शिरपूर पोलिसांना देण्यात आली. 

पोलिसांनी तात्काळ घटनास्थळ गाठून घटनास्थळाचा पंचनामा करीत मृतदेह उत्तरीय तपासणी करीता ग्रामीण रुग्णालयात पाठविला. मृतक पवन कोडापे याला सात वर्षांची मुलगी आहे. त्याने आत्महत्या केल्याने मुलीच्या डोक्यावरील पित्याचे छत्र हरपले आहे. त्याच्या आत्महत्येने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. आज मृतदेहाचे शवविच्छेदन झाल्यनानंतर त्याचा मृतदेह अंतिम संस्काराकरिता कुटुंबियांच्या स्वाधीन करण्यात आला. पुढील तपास शिरपूर पोलीस करीत आहे. 

No comments:

Powered by Blogger.