प्रशांत चंदनखेडे वणी :-
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते राजू उंबरकर यांच्या मातोश्री सुनंदा मधुकरराव उंबरकर (वय ८५) यांचे आज, गुरुवार दिनांक १६ ऑक्टोबर रोजी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या निधनाने उंबरकर परिवारावर शोककळा पसरली असून, वणीच्या राजकीय आणि सामाजिक क्षेत्रावरही दुःखाचे सावट पसरले आहे. उद्या १७ ऑक्टोबरला सकाळी त्यांच्यावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार होणार आहेत.
दिवंगत सुनंदा उंबरकर या कर्तृत्ववान, सौम्य स्वभावाच्या आणि धर्मनिष्ठ स्त्री म्हणून परिचित होत्या. मनसे नेते राजू उंबरकर यांच्या राजकीय वाटचालीत त्यांनी प्रेरणास्थान व आधारस्तंभाची भूमिका बजावली. त्यांच्या मार्गदर्शनामुळेच राजू उंबरकर यांनी वणी परिसरात आपले ठोस राजकीय स्थान निर्माण केले.
त्यांच्या निधनाचे वृत्त कळताच राजकीय, सामाजिक व व्यावसायिक क्षेत्रातील मान्यवरांनी उंबरकर कुटुंबियांची भेट घेऊन संवेदना व्यक्त केल्या. शहरात एकूणच शोकाकुल वातावरण निर्माण झाले आहे.
🕯️ उंबरकर कुटुंबाचे सामाजिक योगदान
दिवंगत सुनंदा उंबरकर यांच्या पश्चात दोन मुले व दोन मुली असा आप्त परिवार आहे. ज्येष्ठ पुत्र प्रवीण उंबरकर हे शासकीय कंत्राटदार असून, कनिष्ठ पुत्र राजू उंबरकर हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जेष्ठ नेते व वणी शहरातील परिचित लोकनेते आहेत. दोन मुली, नातवंडे असा विस्तृत आप्त परिवार त्यांच्या मागे कर्तृत्ववान पिढीचा वारसा आहे.
💐 सर्व स्तरातून श्रद्धांजली
आईच्या निधनाने राजू उंबरकर यांच्यावर मोठे वैयक्तिक दुःख ओढवले आहे. त्यांच्या मातोश्रीचे निधन झाल्याची वार्ता कळताच शोकाकुल नागरिक, राजकीय कार्यकर्ते व सामाजिक बांधवांनी त्यांच्या घरसमोर एकच गर्दी केली. विविध राजकीय पक्षांतील नेते, पदाधिकारी, तसेच सामाजिक संस्थांच्या प्रतिनिधींनी सुनंदा उंबरकर यांना श्रद्धांजली वाहत त्यांच्या आत्म्यास शांती लाभो, अशी प्रार्थना केली आहे.
मनसे नेते राजू उंबरकर यांच्या मातोश्री वयस्क असल्या तरी ठणठणीत होत्या. पुत्र राजू उंबरकर यांच्यावर त्यांचा प्रचंड जीव होता. राजू उंबरकर घरी परतणार असल्याचा आनंद त्या परिवारासोबत व्यतीत करीत होत्या. अशातच अल्पशा आजाराने त्यांचं निधन झालं. राजू उंबरकर हे आज दुपारी २.३० वाजताच्या सुमारास घरी परतले. मात्र तोवर त्यांच्या मातोश्रीने शेवटचा श्वास घेतला होता. त्यांना खूप काही बोलायचं होतं पण शब्द कंठातच राहून गेले. आईच्या निधनाने नेते राजू उंबरकर यांच्यावर दुःखाचा पहाड कोसळला आहे. त्यांच्या आत्म्यास शांती लाभो हिच प्रार्थना.
No comments: